MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

MLA विजय सरदेसाई 'दोन तोंडाचे मांडूळ', बाऊन्सर्सच्या मुद्यावरुन भाजपने शेअर केला व्हिडिओ

MLA Vijai Sardesai Video: भाजपने आमदार विजय सरदेसाई यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pramod Yadav

पणजी: नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजलेल्या विविध मुद्यांमध्ये बाऊन्सर्सचा मुद्दा देखील चांगलाच गाजला. राज्यात बाऊन्सर्स दादागिरी करत असल्याचे आसगाव प्रकरणाचा दाखला देत आमदार विजय सरदेसाई यांनी मुद्दा उपस्थित केला होता. याच मुद्यावरुन भाजपने सरदेसाईंची फिरकी घेतली असून, त्यांना दोन तोंडाचे मांडूळ म्हटले आहे.

भाजपने आमदार विजय सरदेसाई यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सरदेसाई बाऊन्सर्सच्या बाबतीत दोन वेगवेगळी मतं मांडताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत विजय सरदेसाई यांनी बाऊन्सर्स कोण आहेत? याबाबत प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती.

त्याचवेळी विजय सरदेसाई मंत्री असताना त्यांनी बाऊन्सर्सचे समर्थन केल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. भाजपने सरदेसाई यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिकांवर टीका करताना त्यांना दोन तोंडाचे मांडूळ म्हणून संबोधले आहे.

गोवा भाजपच्या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी अक्षय कुमारच्या खट्टा मिठ्ठा चित्रपटातील मीम जोडण्यात आले आहे.

आसगाव येथील आगरवाडे कुटुंबियांच्या घराची मोडतोड करण्यात आली. यात बाऊन्सर्सच्या सहभागावरुन पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला. बाऊन्सर्स कल्चर राज्यासाठी धोकादायक असल्याचा दावा करत अशा संस्थांवर नियंत्रण ठेवण्याची गरज अधिवेशनात व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाऊन्सर्सच्या दादागिरीबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. यासाठी विशेष विधेयक देखील सादर केले जाणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात ते मांडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने विजय यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या दोन भूमिकांमध्ये मतभेद असल्याचे व्हिडिओतून म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT