Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: वारसा मूल्य असलेल्या सर्व सरकारी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा!

आमदार विजय सरदेसाईंची मागणी; मडगाव आरोग्य केंद्राला दिली भेट

गोमंतक ऑनलाईन टीम

Vijai Sardesai on Audit of Government Buildings: वारसा मूल्ये असलेल्या सरकारच्या मालकीच्या सर्व जुन्या इमारतींचे ताबडतोब स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

मडगाव आरोग्य केंद्राच्या पोर्तुगीजकालीन इमारतीच्या भींतीचा काही भाग कोसळल्याने आज, शनिवारी त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.

आमदार सरदेसाई म्हणाले, आजची ही घटना म्हणजे, यापुढे या अशा जुन्या इमारतींची अवस्था काय होऊ शकते याचे उदाहरण आहे. या घटनेने सरकारचे डोळे उघडावेत. मडगाव नगरपालिका, कोमुनिदाद इमारती यांचीही अवस्था अशीच होऊ शकते. याकडेच या घटनेने लक्ष वेधले आहे. सरकारने आताच त्यासाठी पाऊले उचलावीत.

ते म्हणाले, मागे मी विधानसभेत हा विषय चर्चेस आणला होता. असे ऑडिट केले जाणार असे मला आश्वासन दिले होते. आता सरकारने त्या आश्वासनाची पूर्तता करावी. गोव्यातील खासगी पुरातन वास्तू सांभाळून ठेवण्यासाठीही सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे.

सुदैवाने ही घटना रात्री घडली. दिवसा घडली असती तर जीवितहानी झाली असती. मडगावच्या आमदारांनी पक्ष बदलताना जे बोलले होते, त्याप्रमाणे देवाशी बोलण्याची वेळ आली आहे.

फातोर्डा येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याची परिस्थिती आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, रस्ते बांधकामात सर्वात जास्त कमिशन गोव्यात घेतले जाते. असे कमिशन घेऊन कामे केल्यास त्याचा परीणाम असाच होईल. कामाचा दर्जाही खराबच राहतो.

माझ्या कार्यकाळात आम्ही 2014 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते आगळीपर्यंत रस्ता तयार केला. त्या रस्त्यावर एकही खड्डा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT