Venzy Viegas About Suleman Khan Video X
गोवा

Suleman Khan Video: अटक 2 दिवसांपूर्वी, मग व्हिडिओ व्हायरल कसा? आमदार व्हेन्झी व्हिएगस यांचा प्रश्‍न

Venzy Viegas About Suleman Khan Video: व्हिएगस म्हणाले, या सर्व प्रकरणावरून सरकार काहीही करू शकते, असे दिसून येते. सुलेमान पलायन प्रकरणात जेवढे आहेत, त्यांना चौकशीसाठी का बोलाविले जात नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Venzy Viegas About Suleman Khan Viral Video

पणजी: सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याचा व्हिडिओ आत्ताच व्हायरल कसा झाला. त्याला जर दोन दिवसांपूर्वी अटक केली होती, तर व्हिडिओ कसा आणि कोणाद्वारे तो व्हायरल करण्यात आला, याविषयी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

जुने गोवा पोलिस स्थानक आपचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांना जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावून सोमवारी बोलावून घेण्यात आले होते. ॲड. पालेकर यांना पाठिंबा देण्यासाठी आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा यांच्यासह कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली होती. एका बाजूला ॲड. पालेकर यांचा जबाब पोलिसांमध्ये नोंदविला जात होता, तर त्याच दरम्यान सुलेमानचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यावर तत्काळ आमदार व्हेन्झी यांनी पत्रकारांकडे पक्षाच्यावतीने आपली बाजू मांडली.

सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खानचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये आम आदमी पक्षाचे गोव्याचे संयोजक ॲड. अमित पालेकर यांच्यावरच सुलेमान याने व्हिडिओमध्ये नावे घेण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. याच विषयावर आमदार व्हेन्झी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन दिवसांपूर्वी जर सुलेमानला अटक झाली असेल तर व्हिडिओ आत्ताच कसा व्हायरल झाला, हा व्हिडिओ माध्यमांपर्यंत कोणी पाठवला, ज्यांनी तो व्हिडिओ पाठवला, त्याला पोलिसांनी आणायला हवे. त्या व्हिडिओमध्ये ज्या तारखा सुलेमान सांगत आहे, त्यात तफावती आहेत. कोणी तरी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली आहे आणि तो ती वाचत असल्याचेच दिसत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

व्हिडिओ कोणी काढायला लावला?

व्हिएगस पुढे म्हणाले, या सर्व प्रकरणावरून सरकार काहीही करू शकते, असे दिसून येते. सुलेमान पलायन प्रकरणात जेवढे आहेत, त्यांना चौकशीसाठी का बोलाविले जात नाही. जमीन हडपप्रकरण ॲड. पालेकर यांनी उघड केल्यामुळेच त्यांना त्रास देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. आज पालेकरांना, उद्या आपणास आणि परवा क्रूझ सिल्वा किंवा इतरांनाही सरकार त्रास देऊ शकते. अमित पोलिस स्थानकात आहे आणि त्यामुळेच सुलेमानला कोणी व्हिडिओ काढायला सांगितला काय? असा प्रश्‍नही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Google Pixel 11 Series भारतात लॉन्च! 5x झूम, Magic Capture अन् Gemini AIसह मिळणार भन्नाट फीचर्स; किंमत किती? जाणून घ्या

Surya Gochar 2026: 31 ऑगस्टला सूर्याचा ‘पूर्वाफाल्गुनी’ नक्षत्रात महाधमाका! 'या' 5 राशींची चांदीच चांदी; मिळणार राजासारखे वैभव

SCROLL FOR NEXT