MLA Venzy And Minister Cabral  Dainik Gomantak
गोवा

Sal River: साळ नदी प्रदूषण! मंत्री काब्राल यांच्याविरुद्ध आमदार वेंझीची पोलिसांत तक्रार; केले गंभीर आरोप

काब्राल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांनी नदी जाणूनबुजून प्रदूषित केल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

बाणावलीचे आमदार वेंझी विएगस यांनी साळ नदीच्या प्रदूषणावरून, पर्यावरण मंत्री निलेश काब्राल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो यांच्याविरोधात मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. साळ नदीचे प्रदूषण जाणूनबुजून सुरू ठेवले असल्याचा आरोप आमदार विएगस यांनी केला आहे. यापूर्वी देखील साळ नदीच्या प्रदूषणावरून आमदार विएगस यांनी पर्यावरण मंत्री काब्राल यांचा राजीनामा मागितला होता.

जलस्त्रोतांचे प्रदूषण जाणूनबुजून करणाऱ्यावर भारतीय दंड संहीतेच्या 277 कलमाखाली फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. साळ नदीत सहा ठिकाणाहून सांडपाणी मिसळत आहे याची एका वर्षापूर्वी माहिती दिली होती. असे असुनही हे प्रदूषण थांबविण्यासाठी त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. यामुळे या नदीतील मासे मृत झाले आणि दूषित मासे खावून लोक आजारी पडत आहेत, याला सर्वस्वी या दोन व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप वेंझी विएगस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

आमदार वेंझी विएगस

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याविषयी आपण पत्र लिहिले असून काब्राल यांच्याकडून पर्यावरण खाते काढून घ्यावे, तसेच मोंतेरो यांना त्या पदावरून निलंबित करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. असे विएगस यांनी सांगितले.

मोंतेरो या मागची चार महिने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. मच्छीमारी खात्याचे संचालकपदही त्यांच्याकडेच आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात केलेल्या पाहणीत सदोष सांडपाणी वाहिनीमुळे सहा ठिकाणाहून सांडपाणी साळ नदीत जात असल्याचे उघड झाले होते. मात्र हे पाणी थांबविण्यासाठी या दोघांनी काहीच उपाययोजना केली नाही असा आरोप त्यांनी केला.

विएगस यांचे मंत्री काब्राल यांच्यावर गंभीर आरोप

पर्यावरण मंत्री काब्राल हे स्वतः निष्क्रिय आहेतच त्याशिवाय त्यांची वृत्ती उर्मट असून काही दिवसापूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना सर्वानी त्यांच्या या उर्मट वृत्तीचा अनुभव घेतला आहे असे विएगस म्हणाले.

पाटबंधारे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या साळ नदीच्या प्रदूषण प्रकरणात त्वरित लक्ष घालावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी फक्त मडगाव आणि फातोर्डा आमदारां बरोबरच चर्चा न करता नावेली, वेळ्ळी येथील आमदारांसह स्वतःलाही बोलवावे अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT