गोव्यात पर्यटन स्थळांना (Goa Tourism) वाढती पसंती असल्याने हवाई प्रवास देखील वाढला आहे. हवाई प्रवाशांची वाढती संख्या पाहता राज्यात दोन विमानतळांची गरज आहे. हवाई प्रवासाला पर्यटकांची वाढती पसंती असल्याने राज्यात पुढील वीस वर्षात कदाचित तिसऱ्या विमानतळाची गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Minister Mavin Gudinho) यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) बंद होणार असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी निशाना साधला. मुरगाव तालुक्यातील वीज-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन वीज सबस्टेशनसाठी जमीन पाहणी केली जात असलल्याचेही गुदिन्हो यावेळी म्हणाले.
दाबोळी येथे 33 केव्हीए डबल सर्किट हाय टेंशन लो सॅग कंडक्टर सीए ब्लेस बदलण्याच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, चिकलीचे सरपंच कमला प्रसाद यादव व इतर मान्यवर उपस्थितीत होते. यावेळी गोदिन्हो यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना माविन गुदिन्हो म्हणाले, "आमच्याकडे 33 केव्हीए पॉवर लाइन्स होत्या ज्यांची क्षमता सुमारे 285 एम्स आणि 250 एम्स होती आणि एकूण क्षमता सुमारे 550 एम्स पेक्षा जास्त नव्हती. नवीन केबल्स 1,000 एम्स पेक्षा जास्त क्षमता प्रदान करतील, याचा अर्थ असा की येथे 33 केव्हीए सबस्टेशन असू शकते. ज्याची गरज आहे. नवीन केबल टाकण्यासाठी आम्ही जमीन पाहणी करत आहोत. याचा फायदा संपूर्ण तालुक्याला होईल. पॉवर केबल्सचे ग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मर वाढवणे आमची प्राथमिकता आहे."
बंद होणाऱ्या विमानतळावर तेराशे कोटी खर्च केले असते का?
दाबोळी विमानतळ बंद होणार नाही. दाबोळी बंद करावयाचे असते तर विमानतळासाठी तेराशे कोटी रुपये खर्च केले असते काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येणाऱ्या काळात हवाई प्रवाशांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे दाबोळी विमानतळाची गरज असेल. दाबोळी विमानतळ हा जुना व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा आहे तर मोपा विमानतळ (New Mopa Airport) एका खासगी कंपनीचा आहे. विमानांसाठी लागणारे इंधन मुरगावातून मोप विमानतळापर्यंत वाहिन्यातून किंवा टँकरातून न्यावे लागणार आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च वाढणार आहे. असे माविन गुदिन्हो म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.