MLA Ulhas Tuenkar dainik gomantak
गोवा

Assembly Elections 2020 : ही आमदारकी माझ्यासाठी लॉटरी नाही : आमदार तुयेकर

Assembly Elections 2020 : मतदारसंघात काम करण्याच्या माझ्या 20 वर्षांच्या बांधिलकीचे हे फळ आहे : आमदार तुयेकर

दैनिक गोमन्तक

Assembly Elections 2020 : गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवले आहे. गोवा विधानसभेतील 50% टक्के जागा म्हणजे 20 जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला निव्वळ 11 जागा आल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने 2 जागा जिंकत भाजपला पाठिंबा दिला आहे. आम आदमी पार्टीने (AAP) 2 जागा जिंकत आपली जादू दाखवली आहे. याचबरोबर 3 अपक्ष उमेदवार देखील लोकांनी निवडून दिले आहेत. तर 20 जागा एकट्या भाजपने जिंकल्या असून 3 अपक्ष उमेदवारांनी देखील आपला पाठिंबा भाजपला दिला आहे. त्यामुळे भाजपचीच सत्ता गोव्यात येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित आमदार उल्हास तुयेकर यांनी, आमदार म्हणून निवडून येणे ही मला लॉटरी नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत. (Newly elected MLA Ulhas Tuenkar said It's not a lottery for me to get elected as MLA)

विधानसभा निवडणूकीकडे (assembly elections) पाहता अनेक जनांनी आप आपल्या पद्धतीने तयारी केली होती. तर पक्षीय बळ ही आपल्या सोबत घेत प्रचाराची रणनीती आखली होती. तर अनेक जनांनी पहिल्यांदाच आपले नशिब आजमावले होते. यात काहींना आमदारकीची लॉटरी लागली तर काहींची विकेट पडली. मात्र नवलीमचे (Navelim) नवनिर्वाचित आमदार उल्हास तुयेकर (MLA Ulhas Tuenkar) यांनी, ही आमदारकी म्हणजे आपल्याला लॉटरी नसल्याचे सांगितले. तसेच आपण गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहोत. त्यामुळे एक सच्चा कार्यकर्त्याला आमदारकीचे तिकीट देण्याचे काम भाजप (BJP) ने केले. तर त्या संधीचे सोने करत मला आमदार जनतेने केले. मी, माझ्या 20 वर्षांच्या कालावधीत मतदारसंघात जे काम केले हे यश त्या बांधिलकीचे हे फळ आहे, असेही नवनिर्वाचित आमदार (MLA) तुयेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT