सांगे आयआयटी प्रकल्पावर गोवा सरकार ठाम आहे. कारण सांगे येथील आयआयटी प्रकल्प जमिन सीमांकनासाठी एक टीम गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन शेतकऱ्यांनी याला जोरदार विरोध केला आहे, तर गोवा सरकार हा प्रकल्प पुर्ण करणार असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता चिघळणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
(MLA Subhash Phal Dessai informed The team to demarcate the land for IIT in Sanguem will land in Goa)
गेले काही दिवस सांगे आणि परिसरातील नागरिकांनी 'जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या' अशा घोषणा देत आयआयटी प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. यासाठी स्थानिकांनी सांगे परिसरात निषेध मोर्चे काढले आहेत. त्यासोबत पणजीतील आझाद मैदानावरही मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढत सांगे आयआयटी प्रकल्पासाठीच्या विरोधाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
सांगे आयआयटी प्रकल्प गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा - मुख्यमंत्री
याबाबत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगेतील आयआयटी प्रकल्प गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तो होणारच आहे असे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. यासाठी ज्यांच्या नावावर जमिनी आहेत, त्यांनी कागदपत्रांसह संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांना भेटावे त्यांना राज्य शासनाने सूचना दिली असून अशा शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले जातील असेही म्हटले आहे.
मंत्री सुभाष फळ देसाई यांनीही आयआयटी प्रकल्पासाठी सीमांकन करताना ज्या शेतकऱ्यांना त्या जमिनीवर दावा करायचा आहे त्यांनी आपल्या कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे. मात्र जमिनीच्या मालकीचा दावा करण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत असे ते म्हणाले
जर कोणी जमिनीच्या मालकीचा दावा करून पुढे आला तर सरकार त्यांचे प्रश्न तातडीने सोडवेल तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची शाश्वती गोवा सरकार देत आहे, असे म्हणत आयआयटी प्रकल्पासाठीचे काम आता वेगाने सुरू होणार असल्याची अप्रत्यक्ष सुचित केले आहे.
त्यामुळे यापुढे सांगे आणि परिसरातील नागरिकांचा आयआयटीसाठीचा विरोध वाढणार आहे की, गोवा सरकारच्या आव्हानाला साथ देत आयआयटी प्रकल्पाचे सीमांकन सुरू होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.