Goa News: '52' कोटी खर्च करुन उभारलेले हॉस्पिटल सध्या मोकाट गुरांचा आसरा

Goa News: सरकारकडून प्रत्येक पंचायत आणि पालिकेला कोंडवाडे उभारण्यासाठी खास निधीची तरतूद केली आहे.
Goa News | Cattle
Goa News | Cattle Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: तुये येथे 52 कोटी रुपये खर्च करून उभारलेले हॉस्पिटल सध्या मोकाट गुरांचा आसरा बनले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गोमेकॉशी निगडीत तुये हॉस्पिटल 52 कोटी रुपये खर्च करून उभारले. शंभर खाटांची सोय असलेले हे नवीन हॉस्पिटल इमारत सध्या मोकाट गुरांचा आसरा बनला आहे. या वास्तूला जणू कोंडवाड्याचे स्वरुप आले आहे.

या हॉस्पिटलची इमारत मागील पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाली. परंतु आज आवश्यक साधन सुविधा फर्निचर वेगवेगळी यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल कार्यान्वित होऊ शकले नाही. मांद्रे मतदार संघाचे पालकमंत्री म्हणून स्वतःच जबाबदारी घेणाऱ्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी तुयेचे उपसरपंच नीलेश कांदोळकर यांनी केली आहे.

Goa News | Cattle
FDA Goa: अन्न व औषध प्रशासनाची दिवाळीपूर्वी छापेमारी; हजारो किलो खवा, पराठा, फरसाण, मिठाई जप्त

मागील चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत मांद्रे येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आले होते, त्यावेळी मांद्रेत भाजपाचा आमदार नसला तरी आपण या मतदार संघाचे पालकत्व स्वीकारतो असे जाहीर केले होते. त्यानुसार आता सावंत यांनी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कांदोळकर यांनी केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवून त्यांच्या कारकिर्दीत तुये येथे हॉस्पिटलच्या जवळच एकूण 52 कोटी रुपये खर्च करून नवी इमारत उभारली. मागील पाच वर्षांत या इमारतीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.

गोठेही आता झाले इतिहासजमा

मोरजी पंचायत क्षेत्रात पूर्वी मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे होती. ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडे किमान तीन-चार पाळीव गुरे त्यात गाय, बैल, म्हैस, रेडा अशा जनावरांचा समावेश होता. शेती नांगरण्यासाठी बैलाचा वापर होत होता.

Goa News | Cattle
Goa FDA Raid: मडगाव परिसरात 'FDA'ची कारवाई; 65 हजारांची मिठाई जप्त

किमान 300 शेतकऱ्यांकडे एक बैलाची जोडी होती, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरा शेजारीच एक जनावरांचा गोठा असायचा. काहीचे माळरानावर खास जागेत गोठे होते, हे गोठे आता इतिहासजमा झाले आहेत.

भाडेपट्टीवर गोठा

मोरजी पंचायतीने वरचावाडा येथे एक भाडेपट्टीवर गोठा मागील आठ वर्षापूर्वी घेतला आहे. तेथे मोकाट गुरे पकडून ठेवली जाणार होती. अशी गुरे पकडण्यासाठी एका मजुराची नेमणूक केली होती. मात्र आजपर्यंत त्या गोठ्यात रस्त्यावरील एकही जनावर बांधले गेले नाही, हे या गोठ्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हमरस्त्यावरील सर्व जनावरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश पंचायत आणि पालिका क्षेत्राला दिलेला आहे. त्यासाठी सरकारकडून प्रत्येक पंचायत आणि पालिकेला कोंडवाडे उभारण्यासाठी खास निधीची तरतूद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com