MLA Michael Lobo
MLA Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

MLA Michael Lobo: पर्रा येथील रस्त्यांना प्रसिद्ध व्यक्तींची नावे देणार; गावातील सर्व तलावांचे जतन करणार

Akshay Nirmale

MLA Michael Lobo: पर्रा हे पर्यावरणपूरक गाव आहे. या गावातील तलावांचे संवर्धन केले जाईल. येथील सर्व तलावांचे जतन करण्यात येईल, असे आश्वासन कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिले. गावातील सर्व रस्त्यांना गावातील प्रसिद्ध व्यक्तींची नावे देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली.

आराडी येथील सध्याच्या गणेश विसर्जन तलावाच्या नूतनीकरण व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आमदार लोबो म्हणाले की, आम्ही पर्रामधील सर्व तलावांची ओळख निश्चित्त करू. प्रत्येत तलावात पुन्हा पाणी साचेल यासाठी प्रयत्न करू. टाइल्स आणि बैठक व्यवस्थेसह येथे स्वच्छता आणि सुशोभीकरण करू. या तलावांचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल.

लोबो म्हणाले की, पुढच्या पिढीसाठी तलावाचे सुशोभीकरण आणि देखभाल करणे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच ही जमीन जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत. केवळ तलावांचे नूतनीकरण आणि पुनर्संचय करणे महत्त्वाचे नाही.

या तलावांची देखभालही तितकीच महत्त्वाची आहे. स्थानिकांनीही या तलावांची काळजी घ्यावी. नूतनीकरण केलेल्या जागेचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी.

ते म्हणाले की, पर्रा पंचायत लवकरच गावातील रस्त्यांना नावे देणार आहे. विविध क्षेत्रात नाव कोरणाऱ्या गावातील लोकांची नावे देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होणे गरजेचे आहे.

गावातील अनेक लोकांनी रस्ता रुंदीकरण आणि इतर विकासकामांसाठी स्वखुशीने जमीन देऊ केली आहे. विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंचायत त्यांचा गौरव करेल, असेही ते म्हणाले.

पर्राचे सरपंच चंदनंद (चंदू) हरमलकर यांनी विकसित केलेल्या तलावांची देखभाल स्थानिकांनी करावी, असे आवाहन केले. उपसरपंच डॅनियल लोबो यांनी गावाच्या शाश्वत विकासासाठी स्थानिकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT