Goa Solar Plant: राज्यात मोठे सोलर प्लँट उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू; मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीचा रोडमॅप...

सल्लागार करणार व्यवहार्यता अभ्यास; राज्यात 2030 पर्यन शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य
Goa Govt Green Plan:
Goa Govt Green Plan:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Govt Green Plan: गोव्यात वर्षातील 8-9 महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीसाठी गोवा योग्य राज्य आहे. त्यामुळेच गोवा राज्य सरकार सन 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीची रोडमॅप तयार केला गेला आहे. गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GEDA) मार्फत सरकारी इमारती आणि शाळांच्या इमारतींवर ग्रिड-कनेक्टेड सौर ऊर्जा संयंत्रे बसवली जाणार आहेत

त्यापुर्वी एखादे ठिकाण अशा संयंत्रांसाठी कितपत व्यवहार्य असेल हे पाहण्यासाठी अभ्यास करून नंतर तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याची राज्याची योजना आहे. याशिवाय, राज्यात 10 मेगावॅट जमिनीवर बसवलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य करत आहे.

Goa Govt Green Plan:
Goa Medical College: गोव्यात 46 रुग्णांना प्रतीक्षा अवयव दानाची; मृताच्या कुटूंबियांची संमती ठरते महत्वाची...

या व्यवहार्यता अभ्यासाचे उद्दिष्ट सौर उर्जा प्रकल्पांसाठी ठिकाणे ओळखणे आणि त्यानंतर ग्रीडशी जोडलेली सौर ऊर्जा संयंत्रे उभारण्यासाठी निविदा काढणे हे आहे. GEDA ने आधीच अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे आणि प्रस्ताव तयार केला आहे.

त्यामध्ये जमिनीची मर्यादा, विद्यमान ग्रीड क्षमता आणि अंदाजित ऊर्जेची मागणी विचारात घेतली जाईल.

सौर ऊर्जेद्वारे वीजेची निर्मिती आणि संयंत्रांद्वारे वितरण यासाठीची खर्च याबाबत GEDA सल्लागार आणि गोवा वीज विभाग यांच्यासमवेत काम करेल.

Goa Govt Green Plan:
Goa Hospitality Institute: गोव्यात होणार हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण संस्था; पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रम...

नोव्हेंबर 2022 च्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, गोव्याची एकूण स्थापित वीज क्षमता 74.79 MW होती, ज्यापैकी 26.79 MW अक्षय ऊर्जा स्रोतांमधून आणि 48 MW गॅस पॉवर प्लांटमधून होती.

राज्याने जीवाश्म-इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जेच्या वापरापासून दूर जाण्याचा संकल्प केला आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत जसे की सौर, घन कचऱ्यावर चालणारे संयंत्र आणि मोठ्या प्रमाणात सौर संयंत्रे आहेत आणि गोव्यात लक्षणीय वीज निर्मिती करण्यासाठी ऊर्जा संयंत्रे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com