Jeet Arolkar Agarwada High School Inspection Dainik Gomantak
गोवा

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Jeet Arolkar Agarwada High School Inspection: आगरवाडा येथील जे. ए. चोपडेकर स्मृती सरकारी हायस्कूलच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून आमदार जीत आरोलकर यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: आगरवाडा येथील जे. ए. चोपडेकर स्मृती सरकारी हायस्कूलच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून आमदार जीत आरोलकर यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.यावेळी आगरवाडा-चोपडेच्या सरपंच शिल्पा नाईक, उपसरपंच संगीता नाईक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अविनाश गावकर, सोमनाथ मोरजकर, शिक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम खाते आणि वीज खात्याचे अधिकारीव ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अविनाश गावकर यांनी गेल्या वर्षी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या हायस्कूल इमारतीत अनेक गैरसोयी असल्याचे आमदार आरोलकर यांच्या निदर्शनास आणून दिले.इमारतीवरील पत्रे, निकृष्ट दर्जाच्या खिडक्या, शौचालयाच्या कामातील त्रुटी आदी कारणांमुळे इमारतीचे काम सुमार दर्जाचे झाल्याची भीती पालकांमध्ये व्यक्त होत आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी इमारत दुरुस्तीच्या कामादरम्यान खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा संपूर्ण इमारतीत पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार आमदार आरोलकर यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदाराला इमारतीत योग्य वीजपुरवठा सुरू करून पंखे, ट्यूबलाइट्स आदी सर्व सुविधा शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT