MLA from Goa demands physical relation from Marathi actress

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्यातील आणखी एका आमदाराची मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील भाजप (BJP) मंत्र्याच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे प्रमोद सावंत सरकार (CM Pramod Sawant) अडचणीत आले असतानाच गोव्यातील आणखी एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणाला हवामान बदल चळवळीतील कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा यांनी वाचा फोडली आहे. गोव्यातील एक आमदार एका मराठी अभिनेत्रीची गेले आठ महिने छळवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शर्मा यांच्या ट्विटची त्वरित दखल घेताना महिला काँग्रेसच्या (Congress) प्रदेश अध्यक्ष बीना नाईक यांनी मुख्यमंत्री या आमदारावर कारवाई करणार का? की त्या पीडित अभिनेत्रीच्या पालकांना दोष देऊन मोकळे होणार? असा प्रश्न केला आहे. काँग्रेस या विषयावरही आता रान उठवेल, असे संकेत मिळत आहेत.

शमिता शर्मा यांनी आपल्या अभिनेत्री मैत्रिणीवर हा दुर्धर प्रसंग ओढवल्याचे म्हटले असून यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सल्ला घेतला जात असल्याचेही नमूद केले आहे. शर्मा यांच्या ट्विटनुसार ही अभिनेत्री पुण्याची असून या आमदाराकडून तिला वारंवार ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा आरोप केला आहे. लॉकडाऊनच्या काळात या अभिनेत्रीला त्या आमदाराने एका मराठी चित्रपटात आपल्या ओळखीच्या एका निर्मात्याकडून रोल मिळवून दिला होता. त्यावेळी त्या निर्मात्याला देण्यासाठी त्याने तिच्याकडून काही बोल्ड अवस्थेतील फोटोही मागवून घेतले होते.

या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाला; पण नंतर लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे त्या निर्मात्याने त्या अभिनेत्रीचे पैसे थकविले. त्यानंतर तिने गोव्यातील त्या आमदाराला आपले पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केली असता, मी तुझे पैसे मिळवून देतो; पण त्यासाठी तुला माझ्याशी शय्यासोबत करावी लागेल, अशी अट घातली.

मुख्यमंत्री सावंत यांना युरीची कोपरखळी

काँग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी त्या आमदाराचे हे कृत्य धर्म की अधर्म या व्याख्येत बसते हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे असे म्हटले आहे, तर युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंत हे भाजप सरकारच्या प्रगतीपुस्तकात सेक्स स्कॅण्डलचा उल्लेख करणे विसरले, असा टोमणा मारला आहे.

आठ महिने छळवणूक; शमिता शर्मांचे ट्विट

शर्मा यांच्या ट्विटनुसार हा आमदार गेले आठ महिने तिच्यावर या कामासाठी दबाव आणत असून आपले म्हणणे न मान्य केल्यास तिचे बोल्ड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका आमदाराकडून असा प्रकार होणे ही अत्यंत शरमेची गोष्ट असल्याचे बीना नाईक यांनी म्हटले असून मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT