Girish Chodankar | MLA Disqualification Petition Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता याचिकेवर 'या' दिवशी सुनावणी होण्याची शक्यता!

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सभापती रमेश तवडकर आणि आठ आमदारांना नोटीस बजावली

Kavya Powar

MLA Disqualification Petition: 2022 मध्ये कॉंग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर गोव्याच्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. याबाबत काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षातून पक्षांतर केलेल्या आठ आमदारांच्या अपात्रतेची याचिका ठराविक मुदतीत निकाली काढण्यासाठी राज्य विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी केली होती.

याबाबत महत्वाची माहिती अशी की, त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 4 डिसेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सभापती रमेश तवडकर आणि आठ आमदारांना नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाने 2 मे 2023 च्या निकालात सभापती रमेश तवडकर यांनी अपात्रता याचिकेवर जलदगतीने निर्णय घ्यावा, असे नमूद केले होते आणि या याचिकांवर तीन महिन्यांत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले होते. तरीही अपात्रतेची ही याचिका पुढे सरकलेली नाही. प्रत्यक्षात आजपर्यंत सभापतींनी संबंधित आमदारांना याप्रकरणी नोटिसाही बजावलेल्या नाहीत.

गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सभापतींनी निर्णय न घेतल्याचा आरोप करत चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT