Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : सभापतींची भूमिका लवादाप्रमाणे!

ॲडव्होकेट जनरल : आमदार अपात्रतेवर 6 एप्रिलला सुनावणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

घटनेनुसार सभापतींची भूमिका न्यायिक लवादाप्रमाणे आहे. आठ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवरील सुनावणी ठराविक वेळेत घेण्यासाठी ते उच्च न्यायालयाकडून दबाव आणत आहेत.

सभापतींसमोर इतरही याचिका असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे जाणूनबुजून विलंब केल्याचा दावा चुकीचा आहे, असा युक्तिवाद गोवा खंडपीठासमोर ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केला.

ही सुनावणी अपूर्ण राहिल्याने 6 एप्रिलला ठेवली आहे. याचिकादारातर्फे ॲड. अभिजीत गोसावी यांनी बाजू मांडली. ही याचिका सादर करून पाच महिने उलटले तरी त्यावर सुनावणी झालेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांवरील सुनावणी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कराव्यात. याचिका सादर करण्यास विलंब झालेला नाही.

आठ आमदार फुटल्यानंतर याचिकादाराला आवश्‍यक दस्तावेज मिळण्यास एक महिना लागला. त्यानंतर ही याचिका सभापतींसमोर सादर केली. अजूनही ती सभापतींनी सुनावणीस घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने अधिकार वापरून सभापतींना निर्देश द्यावेत, असा युक्तिवाद ॲड. गोसावी यांनी केला.

यापूर्वी काँग्रेसचा 10 आमदारांचा गट फुटून भाजपमध्ये गेला होता, त्यावेळीही याचिका सादर केली होती. मात्र, सभापतींसह उच्च न्यायालयानेही ती फेटाळली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

वकील अनुपस्थित

याचिका सुनावणीस आली असता याचिकादार वा त्यांचे वकील उपस्थित न राहिल्याने त्यावरील सुनावणी वर्षानंतर ठेवली आहे. त्यांच्या पहिल्या याचिकेत उच्च न्यायालयाने ती फेटाळताना निरीक्षणे केली आहेत.

त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निवाडा आला तर विविध राज्यांतील आमदार फुटीसंदर्भातील घोळ स्पष्ट होईल, अशी बाजू पांगम यांनी मांडली.

क्रमवारीनुसार सुनावणी

सभापतींसमोर अशाच प्रकारच्या दोन याचिका आहेत. त्यावरील सुनावणी सुरू आहे. या याचिकांवरील पुढील सुनावणी 5 एप्रिलला आहे. त्यावरील सुनावणी पूर्ण होताच चोडणकर यांची याचिका सुनावणीस घेतली जाईल.

याचिकांच्या क्रमवारीनुसार ही सुनावणी सभापतींकडून घेतली जात आहे. त्यांच्यापूर्वी सादर झालेल्या याचिकांवरील सुनावणी बाजूला ठेवून त्यांची याचिका अगोदर सुनावणीस घेणे नियमानुसार योग्य होणार नाही, असा युक्तिवाद पांगम यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: 'गांजा' तस्करीचा प्रयत्न उधळला! आसामच्या तरूणाला सिकेरीतून बेड्या, कळंगुट पोलिसांची मोठी कामगिरी

अँड्र्यू फ्लिंटॉफ WWE मध्ये 'द अंडरटेकर'ला देणार होता टक्कर, पण शेवटच्या क्षणी इंग्लिश दिग्गजानं फिरवली पाठ; काय घडलं नेमकं?

Crime News: माणुसकीला काळिमा! 90 वर्षीय 'आजी'वर 4 नराधमांकडून सामूहिक अत्याचार; तोंडात कापडाचा बोळा कोंबून केलं पाशवी कृत्य

Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

"तो खेळणार आणि टीम इंडियाला जिंकवणार!" वडिलांचा अभिषेकवर अटळ विश्वास, फायनलमध्ये कमबॅक होणार?

SCROLL FOR NEXT