MLA Carlos Ferreira on Government PWD Work Dainik Gomantak
गोवा

MLA Carlos Ferreira: सरकारने राज्यातील बांधकामांची नियमित देखभाल करणे आवश्यक!

नीलेश काब्राल आता सार्वजनिक बांधकाम मंत्री नसले तरी मी त्यांचे आभार मानतो; आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा

Kavya Powar

MLA Carlos Ferreira on Government PWD Work

सरकारने बांधलेल्या पुलांसारख्या बांधकामांच्या दुरुस्तीची मोठी कामे टाळण्यासाठी नियमित देखभालीची गरज आहे, असे मत हळदोणाचे आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा यांनी व्यक्त केले. काल सोमवारी कारोणा-कालवी पुलाच्या जीर्णोद्धाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

हा पूल बांधल्यापासून या पुलाची कोणतीही देखभाल करण्यात आली नव्हती. अशा कामांची नियमित देखभाल व्हायला हवी. तसे झाले नाही तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्याची गरज भासते. पोलादाला गंज चढला असून पुलाचा रंगही फिकट झाला आहे. संपर्क रस्त्यांचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. 59 लाख रुपये खर्चून हे काम हाती घेण्यात येणार आहे, असे फरेरा यांनी सांगितले.

गंज हटविण्याचे काम हाती घेतल्यानंतर रोषणाईचे कामही सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अनेक अपघात झाले असल्याने संपर्क रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. विकासकामांना मंजुरी मिळत असल्याने आनंद होत आहे. दरम्यान, आणखी कामे नियोजित आहेत. खोर्जुवे पुलाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. तेही लवकरच होईल.

या कामाला मंजुरी दिल्याबद्दल फेरेरा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानले. निविदा निकाली काढून वर्क ऑर्डर जारी झाल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. नीलेश काब्राल आता सार्वजनिक बांधकाम मंत्री नसले तरी मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्या कार्यकाळात महत्वाची कामे मंजूर केली होती. कामे मार्गी लागावी, यासाठी मी दर आठवड्याला त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. तसेच प्रधान मुख्य अभियंत्यांनी केलेल्या तत्परतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT