Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

Haath Kaatro Khamb History: "लोकांचे हात कापले जायचे, याचे पुरावे कुठे?" फेरेरांच्या सवालाने 'हात कातरो' खांबाचा वाद विकोपाला; पुराव्यांच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड?

Carlos Ferreira On Haath Kaatro Khamb: जुने गोवा येथील ‘हात कातरो खांब’ या स्मारकावरून सध्या गोव्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: जुने गोवा येथील ‘हात कातरो खांब’ या स्मारकावरून सध्या गोव्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी ऐतिहासिक तथ्यांचा हवाला देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या खांबापाशी लोकांचे हात कापले जात असल्याच्या दाव्याला कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा नाही, असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. सोमवारी, पणजीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार फेरेरा यांनी प्रशासनाला आणि जनतेला भावनेपेक्षा तथ्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, इतिहासाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय हा केवळ ऐकीव माहितीवर आधारित नसावा. ३०-५० वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी सांगितले किंवा काही जुन्या पुस्तकांमध्ये कथा लिहिल्या आहेत, म्हणून आपण त्यांना ऐतिहासिक सत्य मानू शकत नाही. कोणत्याही घटनेला इतिहास म्हणून मान्यता देण्यासाठी भक्कम पुरावे आणि अधिकृत दस्ताऐवजांची गरज असते.

आमदार फरेरा यांनी ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत सांगितले की, ही रचना ऐतिहासिकदृष्ट्या ‘पेलोरिन्हो नोवो’ म्हणून ओळखली जात असे. केवळ ऐकीव किंवा दंतकथांच्या आधारे अशा स्थळांचे अधिकृतपणे नामकरण करणे किंवा त्यांना तशी मान्यता देणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतिहासाचे चुकीचे सादरीकरण राज्यासाठी घातक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. ‘अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे तयार केलेले कथानक समाजात फूट पाडू शकते आणि ते अत्यंत जोखमीचे आहे. गोव्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी राज्याचा इतिहास हा केवळ दस्तऐवजीकरण केलेल्या तथ्यांवरच आधारित असायला हवा, असे मत फरेरा यांनी व्यक्त केले. हे हात कातरो खांब म्हणण्याचा प्रकार हेतुपुरस्सर रणनीती असून लोकांत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल कथित अवमानकारक विधाने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गोव्यात संतापाची लाट असून, आमदार फेरेरा यांनी सरकारकडे कडक भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना केवळ अटक करून चालणार नाही, तर त्यांच्यावर ‘रासुका’ लावून त्यांना स्थानबद्ध केले पाहिजे, असे फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT