Kundaim  Dainik Gomantak
गोवा

Goa Quepem: नागुर्मा-कुडईकरांना पावला बाप्पा, डिकॉस्ता यांनी करून दिली विजेची सोय!

एल्टन यांनी या वाड्यावरील पाच कुटुंबाला स्वखर्चाने 42 विजेचे खांब उभारून त्यांच्यासाठी विजेची सोय करून दिली

दैनिक गोमन्तक

गोवा हे प्रगतशील राज्य...या प्रगतशील राज्यात अनेक ठिकाणी अद्यापि मूलभूत सुविधांची वाणवा...याचे उदाहरण केपे मतदार संघातील नागुर्मा कुडई kundaim हा वाडा. परंतु याठिकाणी केवळ विजेचे आश्‍वासन मिळत होते, पण वीज खांबाचेही दर्शन येथील लोकांना कधी झालेच नाही. अजूनपर्यंत येथे विजेची सोय नव्हती. राजधानी पणजीपासून 150 किमीच्या दूरवर नागुर्मा कुडई हा वाडा. ना रस्ता ना पाणी, अशा या पाचवीला पुजलेल्या समस्येचे निराकरण केले ते आमदार एल्टन डिकॉस्ता (Eltone D' costa) यांनी. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वीज आली येथील कुटुंबा जणू बाप्पांच्या पावल्याचा आनंद झाला.

एल्टन यांनी या वाड्यावरील पाच कुटुंबाला स्वखर्चाने 42 विजेचे खांब उभारून त्यांच्यासाठी विजेची सोय करून दिली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर विजेची सोय उपलब्ध झाली आणि त्याचा शुभारंभही आमदार डिकॉस्टा यांनी केले. यावेळी गोवा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस गुरु वेळीप, विनायक वेळीप, गोवा सिफेरर असोसिएशनचे अध्यक्ष फ्रॅंक व्हिएगस, शांता वेळीप व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार डिकॉस्टा म्हणाले की, केपे (Quepem) मतदारसंघ हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जाईल, अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी खोला पंचायत क्षेत्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे सोडविता आल्या. जनतेच्या समस्या सोडवण्यामागे कोणीही राजकारण करू‌ नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. कुडई- खोला येथील मैदानाचे काम लवकरात

लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न‌ असेल. आम्ही गेली अनेक वर्षे चिमणीचा आदर घेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची इच्छा असूनदेखील आर्थिक समस्येमुळे पुढचे शिक्षण घेता आले नाही. केपेचे आमदार डिकॉस्टा निवडून आले नसते तर आम्हाला कधीही विजेचा प्रकाश पहायला मिळाला नसता. त्यांच्यामुळे आज आमचे जीवन प्रकाशमय झाले आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ महिला रिमा वेळीप यांनी व्यक्त केली.

* एल्टन डिकॉस्टा, आमदार-

गोवा मुक्त होऊन आता 60 वर्ष पूर्ण झाली. पण अजून विजेची लोकांना मुलभूत सुविधा प्राप्त होत नाही, ही खूपच वाईट गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने केवळ दिखावा करणारे कार्यक्रम न राबवता प्रत्यक्षात गावोगावी अधिकाऱ्यांना पाठवून त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT