Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: मिझोरामयेथील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे गोव्याशी नाते

Goa Police: लालदुहोमा : गोव्यात कर्तृत्ववान पोलिस अधिकारी ते मिझोराममधील राजकीय नेता

दैनिक गोमन्तक

Goa Police: मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदासाठी नाव घेतले जाणारे लालदुहोमा यांची आठवण अनेक गोमंतकीयांना आजही आहे. 1977 मध्ये भारतीय पोलिस सेवेतील ताज्या दमाचे अधिकारी म्हणून ते गोव्यात हजर झाले होते. त्यावेळी किनारी भागात हिप्पी आणि अमलीपदार्थांचा सुळसुळाट होता. त्याविरोधातील कारवाईचे नेतृत्व त्यांनी केले आणि स्थानिकांच्या अभिनंदनास ते पात्र ठरले होते.

त्यावेळी राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या या कामगिरीची दखल घेण्यात आली होती. तस्करीविरोधातील कारवायांमुळे ते बऱ्यापैकी चर्चेत आले होते. त्यावेळी राज्यात पोलिस महानिरीक्षक या पदावरील व्यक्ती पोलिस दलाची प्रमुख असे. पोलिस महासंचालकपद त्यावेळी अस्तित्वात नव्हते.

मिझोराममधील सहा राजकीय पक्षांची एकत्र मोट बांधून द झोरम पीपल्स मुव्हमेंट पक्ष त्यांनी आकाराला आणला आणि विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. लालदुहोमा यांनी तरुण आयपीएस अधिकारी म्हणून गोव्यातील कामगिरीनेच त्यांचा पुढील प्रवास सुकर केला.

त्यांच्या या बेधडक कारवायांची माहिती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोचली होती. चोगम परिषदेच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या इंदिरा गांधी यांनी लालडूहोमा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. इंदिरा गांधींना ते भेटले. लगेच त्यांना दिल्ली पोलिसात उपायुक्तपदी बढती देत बदली देण्यात आली. पुढे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ते प्रमुख बनले.

गांधी घराण्याच्या जवळिकीमुळे राजकारणात

पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या जबाबदारीमुळे लालदुहोमा स्व. राजीव गांधी यांच्या संपर्कात आले, निकटवर्तीय बनले. याच विश्वासाने १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीचे सचिवपद त्यांना देण्यात आले. त्यानंतर गांधी घराण्याच्या जवळिकीमुळे ते १९८३ दरम्यान राजकारणात येण्याचा विचार करू लागले आणि १९८४ मध्ये खासदारही बनले. पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरलेले ते देशातील पहिले खासदार ठरले होते, याच कारणास्तव त्यांनी आमदारकीही एकावेळी गमावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT