CM Pramod Sawant: ‘सहकारातून स्वाहाकार’ करणाऱ्यांची गय नाही- डॉ. प्रमोद सावंत

सहकार जपण्यासाठी चांगले कायदे करणार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

सहकारातून स्वाहाकार करणाऱ्यांची या पुढे गय केली जाणार नाही. सहकार क्षेत्रात गाेरगरिबांनी गुंतवलेला पैसा अखेर त्यांनाच मिळायला हवा याचे भान शासनाला आहे. म्हणूनच सहकारातून स्वाहाकर करणाऱ्यांना नाईलाजाने जेलची वारी घडवावी लागेल. सहकाराची प्रतिमा स्वच्छ रहावी, यासाठी चांगले कायदे केले जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी केले.

वाळपे शिरोडा येथे बुधवार २५ रोजी सहकार खाते, भारतीय वूमन मल्टीपर्पज सोसायटी, शिवग्राम शैक्षणिक संस्था, गोवा शेतकरी मार्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, सहकार निबंधक विशांत गावणेकर, सरपंच पल्लवी शिरोडकर, जि.पं. सदस्य नारायण कामत, सखा मळीक, राजेश फळदेसाई, श्रीकांत नाईक, उल्हास फळदेसाई व्यासपीठावर होते.

CM Pramod Sawant
Daboli Airport: मोपा सुरू होऊनही दाबोळी सुसाट

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, शिरोडा गावचे सुपूत्र माजी आमदार कै. जयकृष्ण शिरोडकर यांनी गोव्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. सहकाराच्या माध्यमातून शिरोडा गाव समृद्ध करण्याचा आमचा मानस असून शिरोड्यातील सहकारी संस्था त्यांचा पाठपुरावा करत आहेत. गावचा खरा विकास हा कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होत असतो. नवीन शेतकरी निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो, असे शिरोडकर यांनी सांगितले.

भारतीय वूमन मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे उद्‍घाटन करण्यात आले. विशांत गावणेकर यांनी स्वागत केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले तर नारायण कामत यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com