Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : टीसीपी कायद्यात ‘16 बी’ दुरुस्तीचा दुरुपयोग

विजय सरदेसाईंचा आरोप; प्रादेशिक आराखडा 2031 ची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : प्रादेशिक आराखडा 2031 कायदेशीर प्रक्रिया करून तयार करावा, अशी मागणी आज गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी केली. गोवा प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये गोमंतकीयांच्या जमिनींचे गैरप्रकारे रूपांतर केल्याने त्यांना न्याय देण्यासाठी नगर व शहर नियोजन कायद्यात ‘16-बी’ दुरुस्ती आणण्यात आली होती. नगर व शहर नियोजनमंत्री सोडल्यावर या दुरुस्तीचा दुरुपयोग करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

या दुरुस्तीखाली सुमारे 7700 प्रकरणांत सरकारने प्रायोगिक परवाने दिले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व या खात्याचे तत्कालीन मंत्री बाबू कवळेकर यांनी सुमारे 2000 कोटींचा घोटाळा केलेला आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

टीसीपी कायद्यात ‘16-बी’ दुरुस्ती करणारे करते करविते व त्यानंतर ही दुरुस्ती रद्द झाल्यानंतर त्याचे स्वागत करणारे आमदार विजय सरदेसाई अशी टीका होत आहे त्याला उत्तर देताना आमदार सरदेसाई म्हणाले की, 2012 साली भाजप सरकार सत्तेवर आल्यावर काँग्रेस सरकारने अधिसूचित केलेला प्रादेशिक आराखडा 2021 स्थगित ठेवण्यात आला होता. या आराखड्यामध्ये संतुलित गोव्याचा उल्लेख करण्यात आला होता. भाजप सरकारमध्ये सामील झाल्यावर टीसीपी खात्याचा मी मंत्री होतो. या स्थगित ठेवण्यात आलेल्या आराखड्यामध्ये अनेक गोमंतकीयांच्या वसाहतीमधील जमिनी शेतीमध्ये दाखवण्यात आल्याने त्यांच्यावरील हा अन्याय दूर करण्यासाठी आराखड्यावरील स्थगिती उठवून ही ‘16-बी’ दुरुस्ती आणण्यात आली होती.

‘नवा प्रादेशिक आराखडा सर्वांना विश्‍वासात घेऊन करावा’

सध्या राज्याला नव्या प्रादेशिक आराखडा 2031 ची गरज आहे. हा आराखडा सर्व घटकांना विचारात घेऊन, हरकती व सूचना मागवून तसेच सर्व खात्यांना विश्‍वासात घेऊन करायला हवा. मंत्र्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून तो विधानसभेत आणावा. प्रादेशिक आराखडा 2001 नंतर प्रादेशिक आराखडा 2021 करताना मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर झाले आहे. गोमंतकीयांना त्यांचे हक्क पुन्हा मिळवून देण्यासाठी मी 2018 मध्ये मंत्री असताना त्यात दुरुस्ती आणली होती, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT