PFI Ban : नगरसेवकाच्या अटकेने वाळपईत खळबळ

‘पीएफआय’संदर्भात आणखी काहीजणांवर कारवाईची टांगती तलवार
Valpoi Corporator Goa
Valpoi Corporator GoaDainik Gomantak
Published on
Updated on

PFI Ban : सत्तरी तालुक्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे धागेदोरे असल्याचा संशयावरून वाळपई पोलिसांनी शुक्रवारी चार सदस्यांना ताब्यात घेतले. त्यात वाळपईतील प्रभाग सातचे नगरसेवक सरफराज सय्यद यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. तसेच आणखी काहीजणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये नाहीद कमरुद्दीन आगा (वय 38, रा. सय्यद नगर), कियामुद्दीन इसाक आगा (वय 48, रा. नागवे), सर्फराज शमशुद्दीन सय्यद (36, रा. सय्यद नगर), आणि शराफत समुद्दीन हुसेन (58, रा. नागवे) यांचा समावेश आहे. या सर्वांना सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्यासमोर उभे केले असता, त्यांची वैयक्तिक हमीवर सुटका करण्यात आली. यांच्या अटकेमुळे ‘पीएफआय’च्या बैठका वाळपईतील ज्या शाळेत व्हायच्या, त्या शाळेची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यामुळे शाळा व्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वाळपई भागातील सय्यदनगर हा भाग पोलिसांच्या रडारवर असून या ठिकाणी पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Valpoi Corporator Goa
Land Grabbing Case : ‘मामलेदार’ राहुल देसाईचे कर्मचारी एसआयटीच्या रडारवर

बांगलादेशी घुसखोर मास्टरमाईंड

म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे या ठिकाणी भंगार अड्ड्यावर काम करणाऱ्या बिलाल अन्वर आखोन (30) याला दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. चौकशीअंती त्याचा देशविरोधी कारवायांत समावेश असल्याचे समजले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अनेक घटनांचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com