Mission Political Reservation Press Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: आरक्षणाचा विसर; एसटी समाज बहिष्कारावर ठाम

Goa ST Reservation: सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव : मडगावातील बैठकीत आजी-माजी पदाधिकारी एकवटले

दैनिक गोमन्तक

Mission Political Reservation Press: गोव्यातील अनुसूचित जमातीसाठी विधानसभेत जागा राखीव ठेवण्याच्या गोवा सरकारने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने जो थंडा प्रतिसाद दिला.

त्यावरून गोव्यातील अनुसूचित जाती मिशन राजकीय आरक्षण गट निराश झाला आहे. त्यामुळे एसटी समाजाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले आहे.

२ सप्टेंबर रोजी मिशन राजकीय आरक्षण गटाची एक बैठक मडगावात झाली. यात आजी-माजी सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य, अनुसूचित जमातीचे नेते उपस्थित होते.

यावेळी राजकीय आरक्षणाचा मुद्दा गंभीरपणे न घेतल्याने तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा न केल्याने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात उपस्थितांनी संताप व्यक्त केला.

विधानसभेत आश्र्वासन देऊनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायदा व न्याय मंत्री अर्जुन मेघवाल आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ का नेले नाही, असा सवाल मिशनचे सचिव रूपेश वेळीप यांनी केला.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत हल्लीच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री व पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे आरक्षणाचा मुद्दा का उपस्थित केला नाही, असेही रूपेश वेळीप म्हणाले.

आम्ही घटनेच्या कलम ८२ नुसार जागा पुनर्रचना करण्यास सांगत नाही. आम्ही कलम ३३० व ३३२ नुसार जागांच्या आरक्षणांची मागणी करत आहोत. कायदा व न्याय मंत्रालय या दोन्हीमधील फरक समजून घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.

बैठकीत मंजूर केलेले ठराव

प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षणाचा ठराव मंजूर करून घेण्याचा संकल्प करणे

पंचायत स्तरावर बहिष्कार सभा आयोजित करणे. पहिली बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात घेतली जाईल.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारने जागा राखीवतेची अधिसूचना काढली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT