Dhargal-Mopa Road Accident  Dainik Gomantak
गोवा

Mopa-Dhargal Accident: धारगळ अपघाताप्रकरणी मिशन फॉर लोकलने केलीय 'ही' मागणी

कोरगावकर : रहिवाशांवरील गुन्हे मागे घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

सुकेकुळण-धारगळ येथील अपघातावेळी आपुलकीने धावून गेलेल्या लोकांना जबाबदार न धरता कंत्राटदार तसेच अशोका बिल्डकॉन कंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा.

राजकीय दबावाखाली येथील रहिवाशांवर केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

सुकेकुळण येथे 16 जून रोजी ट्रकने नामदेव कांबळी यांच्यासह स्कूटरला सुमारे दोनशे मीटर फरपटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काशिनाथ शेट्ये हे गंभीर जखमी आहेत.

त्यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जो उद्रेक झाला, त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. ज्या कुटुंबांवर आघात होऊन जे दुःखात आहेत, त्यांना पोलिस ठाण्यावर नेणे माणुसकीला धरून नव्हते.

पेडणे पोलिसांनी तेथे जमलेल्या स्थानिकांसह अज्ञात दोनशे जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यातील बरेचजण नामदेव कांबळी यांचे शेजारी व नातेवाईक आहेत, असे कोरगावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

SCROLL FOR NEXT