Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Usgao contaminated water supply: उसगाव तिठा येथील चौगुले वर्कशॉप परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य चेंबरमध्ये सांडपाणी साचत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
Usgao Water Issue
Usgao Water IssueDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: उसगाव तिठा येथील चौगुले वर्कशॉप परिसरातील सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य चेंबरमध्ये सांडपाणी साचत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या चेंबरमधील दूषित पाणी जलवाहिनीत झिरपत असून त्याच पाण्याचा पुरवठा उसगावातील नागरिकांना होत असल्याचा आरोप स्थानिक समाज कार्यकर्त्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

समाज कार्यकर्ते रोहन नाईक आणि नीलेश गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून या मुख्य चेंबरमध्ये सांडपाणी साचत आहे. त्याचबरोबर चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर घाण जमा झाली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Usgao Water Issue
Ancient history of Goa: गोव्याच्या इतिहासाचे दुवे जोडणे अत्यावश्यक

दरम्यान, उसगाव परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असून काही चेंबरमधूनही सतत पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, याकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नीलेश गावडे यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.

या समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाणीपुरवठा खात्याने तात्काळ लक्ष देऊन चेंबरची स्वच्छता, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि पाणी गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा येत्या दोन दिवसांत विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रोहन नाईक आणि नीलेश गावडे यांनी दिला आहे.

Usgao Water Issue
Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

चेंबरमध्ये साचते सांडपाणी

ओपा पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून येणाऱ्या जलवाहिनीतून काहीवेळा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी जलवाहिनीत झिरपत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेच दूषित पाणी पुढे म्हारवा सडा, उसगाव येथील मुख्य पाण्याच्या टाकीत पोहोचते. त्यानंतर गावातील नागरिकांना त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याचे रोहन नाईक यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, पोटाचे विकार व इतर आजार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com