Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावात खळबळ! शिरवडेतील तरूणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; 5 दिवसांपासून होता बेपत्ता

Missing man found dead Khareband: गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३१ वर्षीय सनी सुभाष नाईक या तरुणाचा शोध अत्यंत दुर्दैवीरीत्या संपला आहे.

Sameer Amunekar

मडगाव: गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३१ वर्षीय सनी सुभाष नाईक या तरुणाचा शोध अत्यंत दुर्दैवीरीत्या संपला आहे. मडगाव येथील खारेबांध परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सनीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सिरवडे परिसरात शोककळा पसरली असून, मडगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

२ फेब्रुवारीपासून होता बेपत्ता 

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवडे येथील रहिवासी असलेला सनी नाईक हा २ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होता. तो घरी न परतल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नव्हता.

अखेर शनिवारी खारेबांध येथील स्थानिक नागरिकांना झाडाला लटकलेला एक मृतदेह दिसल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा 

घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासणीत मृतदेहाची ओळख सनी नाईक म्हणून पटली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हा प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Postmortem) रुग्णालयात पाठवला आहे. या अहवालानंतरच सनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. सनीने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे? की यामागे काही वेगळे कारण आहे? या दिशेने पोलीस आता तपास करत आहेत. तरुण मुलाचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने मडगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT