Goa Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Goa Kidnapping Case: बेपत्ता शाळकरी मुलांची महाराष्ट्रातून सुटका, उत्तर प्रदेशातील एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई

Goa Missing Minors Case: कुंक्कळी येथून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी अल्पवयीन मुलांना गोवा पोलिसांनी यशस्वीरित्या शोधून काढले.

Manish Jadhav

Goa Kidnapping Case: कुंक्कळी येथून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी अल्पवयीन मुलांना गोवा पोलिसांनी यशस्वीरित्या शोधून काढले. पोलिसांनी या दोन्ही मुलांना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून यशस्वीरित्या शोधून काढले. याप्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली होती. कॉल रेकॉर्ड आणि विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करुन पोलिसांनी गोव्याबाहेर मुलांच्या हालचालींचा मागोवा घेतला.

अल्पवयीन मुलांना नाशिकला नेण्यात आल्याची खात्री झाल्यानंतर गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने मुलांना सुरक्षितरित्या शोधण्यात आले. आता त्यांना गोव्यात (Goa) परत आणले जात आहे.

दुसरीकडे, अटक करण्यात आलेला व्यक्ती मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याची या प्रकरणात भूमिका आणि संभाव्य हेतू निश्चित करण्यासाठी चौकशी केली जात आहे. त्याने एकट्याने हे कृत्य केले की तो मोठ्या नेटवर्कचा भाग आहे याचा तपास गोवा पोलिसांकडून (Goa Police) केला जात आहे. त्याच्या अटकेमुळे अपहरणाच्या परिस्थितीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Goa Live News: मुंगूल गोळीबार प्रकरण; प्राथमिक तपासात दोन टोळ्यांमधील गोळी युद्ध असल्याचे स्पष्ट

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

Government Doctors: सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर येणार निर्बंध, आरोग्यमंत्र्यांची माहिती; OPD च्या वेळा वाढवण्याचे सूतोवाच

Stray Dog Bytes: फोंड्यात भटक्या कुत्र्यांनी 5 जणांचे घेतले चावे! लोक भयभीत; महिन्याकाठी 100 जणांवर हल्ला

SCROLL FOR NEXT