Goa Kidnapping Case: अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी दोघांना अटक; गाडी जप्त

Colvale Police: कोलवाळ पोलिसांची कारवाई मोहिम
Colvale Police: कोलवाळ पोलिसांची कारवाई मोहिम
Goa Kidnapping CaseDainik Gomantak
Published on
Updated on

माडेल-थिवी येथील एका बाल गृहातील दोन अल्पवयीन मुलींच्या कथित अपहरणप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोघा युवकांना अटक केली. अरबाझ खान (२०, रा. म्हापसा) व सबिर बेतगेरी (२६, रा. ताळगाव) अशी संशयितांची नावे असून पोलिसांकडून अपहरणासाठी वापरलेली (जीए ०९ ए ३६१९) क्रमांकाची कारगाडी जप्त करण्यात आली.

सदर अपहरणाची घटना, ता. ५ जून रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी बालगृहाच्या महिला काळजीवाहूंनी कोलवाळ पोलिसांत फिर्याद दिली. कोलवाळ पोलिसांनी कारवाई मोहिम राबवत, म्हापसा पोलिसांच्या साहाय्याने मरड-म्हापसा येथील एका बिल्डिंगमधून या १३ व १४ वर्षे वयोगटातील अपहृत मुलींची सुटका केली.

बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार काळजी व संरक्षणासाठी या पीडित मुलींना थिवीमधील बालगृहात वास्तव्यास ठेवण्यात आले होते. ५ रोजी रात्री या दोन्ही मुली गायब असल्याचे फिर्यादींना आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

Colvale Police: कोलवाळ पोलिसांची कारवाई मोहिम
Colvale Police: कोलवाळमधील पोलिस अधिकाऱ्यांचे कौतूक; नागरिकाचे पत्र झाले व्हायरल...

अनोळखींनी कायदेशीर पालकत्वातून या अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याचा दावा फिर्यादींनी तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली अन् १२ तासांच्या आत शनिवारी सकाळी म्हापसा पोलिसांच्या मदतीने म्हापसा शहरातून दोन्ही मुलींची सुटका केली. सध्या या दोन्ही मुलींची अपना घरात रवानगी केली आहे.

पीडित मुलींच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी वरील दोन्ही संशयितांना ८ रोजी सायंकाळी पकडून अटक केली. संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १३७(२) तसेच गोवा बाल कायदा कलम ८ अन्वये गुन्हा नोंदवला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळवाळ पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com