
Margao Kidnapping Case
सासष्टी: अपहरणाचा कट रचल्याचा आरोप करून पोलिसांकडे आपल्याविरोधात कुणाल रायकर याने तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार तो आपल्यास देणे असलेले तीन कोटी रुपये हडप करण्यासाठीच असण्याची शक्यता रुबेन वेर्णेकर याने काल (30 ऑक्टोबर) मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला रुबेनचे वकील कपिल वेर्णेकर उपस्थित होते.
रुबेनने सांगितले की, मी तक्रारदार कुणाल रायकर याचे दुकान विकत घेण्यासाठी त्याला तीन कोटी रुपये दिले होते. मी त्याला सेल डीड करण्यास सांगितले. २६ ऑगस्ट रोजी सेल डीड करण्याचे ठरले होते. मात्र, २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने आपल्या विरोधात पैसे देण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार नोंदवली. मी २७ ऑगस्टला ‘सेल डीड’चे काय झाले, हे विचारायला गेलो असता त्याने मला घरातून हाकलून लावले.
ज्या व्यक्तीला आपण मध्यस्थ म्हणून नेले होते त्यानेच जे दुकान आपण विकत घेऊ पाहात आहे, त्यातील ५० टक्के दुकान पूर्वीच विकून व्यवहार पूर्ण केले व त्यासंदर्भात आपल्याला थांगपत्ताही लागू दिला नाही. आता ही माहिती मला समजली. त्यामुळे ज्या व्यक्तीने ५० टक्के दुकान विकत घेतले, तोसुद्धा या कटात सहभागी असल्याचे रुबेनने सांगितले. आपल्या अशिलाने पोलिसांना सर्व सहकार्य दिले आहे, असे रुबेनचे वकील कपिल वेर्णेकर यांनी स्पष्ट केले.
पोलिसांवर राजकीय दबाव असावा. त्यामुळे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेली व्यक्ती पोलिसांना अजूनही सापडत नाही. आपला अशिल व तक्रारदारामध्ये जो व्यवहार झाला त्याची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत व ती पोलिसांना दिली आहेत. तक्रारदाराकडून तीन कोटी रुपये वसूल करण्यासाठी सिव्हिल रिकव्हरी प्रक्रिया सुरू केली आहे, असेही वकील वेर्णेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.