Goa Police  google image
गोवा

गोवा पोलिसांकडून गुजरात पोलिसांची दिशाभूल?; पथक माघारी गेल्यावर दारू तस्करीतील संशयिताने घेतली प्रेस कॉन्फरन्स

Akshay Nirmale

Goa Police : गुजरातमध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असलेलया लिगारिनो डिसूझा याच्या शोधात रविवारी गुजरात पोलिसांचे पथक गोव्यात आले होते. त्यावेळी गुजरातच्या पोलिसांनी डिसूझा सापडत नाही, असे सांगितले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिगारिनो डिसूझा याने थे काणकोण येथे प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे.

गुजरात पोलिसांच्या या पथकाचे नेतृत्व पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याने केले होते. तथापि, गोव्यात त्यांना काहीही हाताशी लागले नाही. त्यावेळी या पीएसआय अधिकाऱ्याने डिसूझा याचा माग न लागल्याने परत जात असल्याचे म्हटले होते.

विशेष म्हणजे, गुजरात पोलिसांनी काणकोण पोलिसांची मदत घेतली होती. त्यामुळे हे केवळ गुजरातच्या पोलिसांचे अपयश नसून गोवा पोलिसांचेही अपयश आहे. गुजरातमध्ये 2021 मध्ये आंतरराज्य दारू तस्करी प्रकरणाशी संबंधित गुन्हा नोंद झाला होता.

त्यानंतर सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिसूझा याने स्वतःची भूमिका मांडल्याचे समजते. विशेष म्हणजे गुजरात पोलीस परतीच्या मार्गावर असताना लिगोरिनो आपल्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांसह पत्रकार परिषदेला संबोधित करत असल्याचे याबाबतच्या व्हिडिओमध्ये दिसते.

त्यामुळे गुजरात पोलिसांची दिशाभूल करून त्यांना डिसूझापर्यंत पोहोचू दिले नाही का, असा सवाल निर्माण झाला आहे. गुजरात पोलिसांनी त्यांच्या दौऱ्यात काणकोण आणि होंडा पोलिस स्टेशनला भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT