Miraai Vehicle Recycling Project Madkaim, Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

Miraai Vehicle Recycling Project Madkaim: राज्यातील भंगार वाहने मोडीत काढून त्यावर प्रक्रिया करणारा ‘मिराई’ प्रकल्प मडकई औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आला असून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Miraai Project Madkaim Goa

मडकई : राज्यातील भंगार वाहने मोडीत काढून त्यावर प्रक्रिया करणारा ‘मिराई’ प्रकल्प मडकई औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आला असून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‍घाटन आज (सोमवारी) सकाळी करण्यात आले.

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई तसेच प्रकल्पाचे मालक तुषार गर्ग तसेच संदीप अगरवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

दिगंबर कामत म्हणाले, राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून त्यामुळे भंगार वाहनांची समस्या दूर होणार आहे. या प्रकल्पाला सरकारचे सहकार्य असून भंगार वाहनांच्या समस्येतून मालकाला सुटकारा मिळणार आहे. भंगार वाहने बऱ्याच ठिकाणी पडून असतात, त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे अशा मालकांनी या प्रकल्पात आपली वाहने पाठवावीत, असे आवाहन दिगंबर कामत यांनी केले.

आमदार गणेश गावकर तसेच आमदार राजेश फळदेसाई यांनीही मिराई प्रकल्पाला शुभेच्छा देताना अशा प्रकल्पाची गोव्याला आवश्‍यकता होती, ती पूर्ण झाल्याचे नमूद केले.

चोरीची वाहने सापडतील?

मिराई प्रकल्पाचे तुषार गर्ग यानी गोवा सरकार तसेच केंद्र सरकारच्या योजनेमुळे हा प्रकल्प उभारणे शक्य झाल्याचे नमूद केले. एखाद्या भंगार वाहनाची माहिती उपलब्ध करूनच मग ही वाहने घेतली जाणार आहेत, त्यासाठी वाहतूक खात्याकडे तशा आशयाचा संबंध प्रस्थापित करण्यात आला असून चोरीची वाहने सापडू शकतात, म्हणून मालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तुषार गर्ग यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT