Kerala Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: तुकडे करुन गोव्यात फेकून दिला मृतदेह; 18 वर्षानंतर आई-बाबांना मिळाले लेकीचे शीर

Kerala Crime News: मृत मुलगी कासारगोड येथील कंत्राटदार केसी हमसा यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती.

Pramod Yadav

Kerala Crime News

केरळ: गोव्यात 18 वर्षांपूर्वी एका 13 वर्षीय मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. या गुन्ह्यात दोषीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुलीवर सन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत अशी मुलीच्या आई-वडिलांची इच्छा होती.

यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली. अखेर 16 वर्षांपूर्वी जप्त केलेली कवटी (डोके) कोर्टाने आई-वडिलांनी दिली. ही कहाणी आहे केरळच्या सोफिया कासारगोडची.

कासारगोड येथील एका ठेकेदाराच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या सोफियाची २००६ मध्ये गोव्यात हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकण्यात आले होते.

पोलिसांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय सोफिया मूळ कर्नाटकची असून, डिसेंबर 2006 मध्ये तिची हत्या करण्यात आली होती. ती कासारगोड येथील कंत्राटदार केसी हमसा यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती.

किचनमध्ये काम करत असताना अचानकपणे लागलेल्या आगीत सोफिया गंभीरपणे जाळली गेली होती. शिक्षेच्या भीतीने कंत्राटदाराने मुलीची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केले आणि नंतर गोव्यातील एका बांधकामाधीन धरणाच्या ठिकाणी फेकून दिले.

2008 मध्ये गोव्यात सापडले होते मृतदेहाचे तुकडे

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सोफियाच्या मृतदेहाचे अवशेष 2008 मध्ये गोव्यात मिळाले होते. 2015 मध्ये स्थानिक न्यायालयाने आरोपीला नंतर अटक करून फाशीची शिक्षा सुनावली असली तरी केरळ उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा 2019 मध्ये जन्मठेपेत बदलली.

कुटुंब कर्नाटकातील कुर्ग येथील आहे

मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला शिक्षा झाली, पण आपल्या मुलीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता यावे अशी पालकांची इच्छा होती. यासाठी कर्नाटकातील कुर्ग येथील रहिवासी असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यासाठी कोर्टात धाव घेतली.

न्यायालयाने मुलीचे शीर दिले पालकांच्या ताब्यात

कासारगोड प्रधान सत्र न्यायालयाने मृत मुलीच्या पालकांची मागणी मान्य करत सोमवारी मुलीची कवटी त्यांच्या ताब्यात दिली. कोर्टाने मृताची आई आयशा आणि वडील मोईथू यांच्याकडे बॉक्स सुपूर्द केला तेव्हा त्यांच्या गावातील लोक आणि जवळचे नातेवाईकही उपस्थित होते.

नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह त्याच्या मूळ गावी घेऊन जात सोमवारी रात्री एका स्थानिक मशिदीत दफन करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT