Congress Rebel MLA meeting with CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Portfolio Distribution To Rebel MLA:'त्या' बंडखोर आमदारांना मंत्रीपद कधी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

आठ बंडखोर आमदारांविरोधात काँग्रेसची आक्रमक भुमिका कायम

दैनिक गोमन्तक

गणेश चतुर्थीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आठ कॉंग्रेस आमदार दाखल झाले आहेत. दरम्यान बराच कालावधी गेल्याने या आमदारांची मंत्रीपदासाठी तगमग सुरु असल्याची राजकीय पटालावर खमंग चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे मंत्री पदे मिळणार का? याबाबत ही कोणाकडे उत्तर नसल्याची स्थिती आजपर्यंत होती. मात्र आज यावर राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाष्य केले आहे.

(Ministries will be given to few rebel MLA's and others will get corporations said goa cm)

मिळालेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत आठ आमदारांना मंत्रीपदे मिळणार का? या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, भाजपात दाखल झालेल्या काही आमदारांना थोड्याच दिवसांत मंत्रिपदे मिळणार आहेत. तर इतरांकडे महामंडळाचा कारभार सोपवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्या या वक्तव्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात बंडखोर आमदारांना भाजप न्याय देणार का? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले आहे. त्यामुळे दबक्या आवाजात सुरु असलेल्या चर्चेला आता पुर्णविराम मिळणार आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांनी केंद्रीय नेतृत्व आणि माझ्यावर विश्वास ठेवूनच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाला योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशिल असून यापुढे ही राज्याच्या विकास कामांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले.

आठ बंडखोर आमदारांविरोधात काँग्रेसची आक्रमक भुमिका कायम

गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मोठं विधान केले असून, विधानसभेत या आमदारांविरोधात अपात्रता याचिका सादर केली आहे. लवकरच या प्रकारची आणखी एक याचिका काँग्रेसतर्फे सादर करणार असल्याचे सांगत काँग्रेसने आपली आक्रमक भुमिका कायम ठेवली आहे.

काँग्रेसच्या विधीमंडळातील दोन तृतियांश आमदारांचा गट भाजपमध्ये विलिन झाला असला तरी काँग्रेस पक्ष झालेला नाही. त्यामुळे भारतीय घटनेतील ‘परिशिष्ट 10’ चे उल्लंघन झाल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT