Goa Former CM Funeral Dainik Gomantak
गोवा

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Ravi Naik Passed Away : बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी, फोंडा येथील खांडपाबांध येथे संध्याकाळी ४ वाजता शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले

Akshata Chhatre

Ravi Naik Funeral Ponda : गोव्याच्या राजकारणातील एक 'पर्व' आणि राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून कार्यरत असलेले माजी मुख्यमंत्री श्री. रवी नाईक (७९) यांचे मंगळवारी (दि. १२) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकारणात आणि जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाईक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, त्यांना संपूर्ण राजकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाईल अशी घोषणा केली. आज, बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी, फोंडा येथील खांडपाबांध येथे संध्याकाळी ४ वाजता शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार पार पडले.

तीन दिवसांचा राजकीय दुखवटा आणि शासकीय सुटी

नाईक यांच्या राज्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गोवा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यात कोणतेही सरकारी मनोरंजनाचे किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

तसेच, नाईक यांच्या सन्मानार्थ, आज, १५ ऑक्टोबर रोजी सर्व राज्य सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, शिक्षण विभागाने शालेय परीक्षांचे वेळापत्रक खंडित होऊ नये यासाठी शाळा आणि परीक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेत्यांकडून आदरांजली: 'एक युगाचा अंत'

रवी नाईक यांच्या निधनामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी नाईक यांना "समाजाच्या भल्यासाठी अथक परिश्रम करणारे समर्पित नेते" असे संबोधले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नाईक हे "एक पर्व होते" असे भावनिक उद्गार काढले, तसेच गोव्याच्या लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे नमूद केले.

गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी त्यांना "गोव्याच्या सार्वजनिक जीवनातील एक आधारस्तंभ" म्हणून गौरवताना, त्यांच्या सामाजिक न्याय आणि प्रशासनातील योगदानामुळे राज्याच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत व्यक्त केले.

विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, " त्यांनी कायम समाजाच्या भल्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांचे दूरदृष्टीचे आणि विकासात्मक उपक्रम गोव्यावर एक अमिट ठसा सोडून गेले आहेत." गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर यांनीही शोक व्यक्त केला आणि सांगितले की, "गोव्याच्या राजकीय पटलावर आणि सार्वजनिक जीवनात त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील."

मतभेद असूनही मनभेद नव्हते

नाईक यांच्या राजकीय परिपक्वतेवर भाष्य करताना सुदिन ढवळीकर म्हणाले, "आमच्यात राजकीय मतभेद होते, पण मनभेद कधीच नव्हते." त्यांनी नाईक यांचे कोंकणी चळवळीतील सक्रिय योगदान आणि गृहमंत्री म्हणून दिलेले उत्तम प्रशासन अधोरेखित केले.

आमदार गोविंद गावडे यांनी तर रवी नाईक यांच्या पाठिंब्यामुळेच आपण विधानसभेत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार अमित पाटकर, व्हेंझी व्हिएगस आणि इतर नेत्यांनी भंडारी समाजाचे प्रमुख नेते म्हणून त्यांचे कार्य स्मरून, या ज्येष्ठ नेत्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली. गोव्याच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेले एक प्रभावी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण गोवा शोकाकुल झाला आहे.c

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, लोक ओक्साबोक्शी रडले; रवींच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

SCROLL FOR NEXT