
डिचोली: एका इमारतीतील फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरमधून गळती लागून जोडपाईपसह शेगडी जळण्याची घटना आज (15 ऑक्टोबर) डिचोली परिसरात घडली. फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करुन सिलिंडर बंद करण्यात यश मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
इमारतीतील अन्य फ्लॅटधारकांनीही सुटकेचा श्वास सोडला. ही घटना डिचोली शहरापासून जवळच असलेल्या रोलिंगमिल-वाठादेव येथील भर लोकवस्तीतील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज (बुधवारी) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
यासंबंधीची माहिती अशी की, फ्लॅटमधील स्वयंपाकगृहातील गॅस सुरु होता. त्यावेळी स्वयंपाकगृहात कोणीच नव्हते.
थोड्यावेळाने काहीतरी जळत असल्याचा वास येऊ लागल्याने फ्लॅटमालक इंतियाज यांनी आत जाऊन बघितले, तेव्हा शेगडीला जोडलेल्या पाईपसह शेगडीने पेट घेतला होता. इंतियाज यांनी वेळ न दवडता गॅस सिलिंडर बंद करुन डिचोली (Bicholim) अग्निशमन दलाला या घटनेची कल्पना दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅटमधील गॅस सिलिंडर आणि शेगडी बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट टळला.
डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधिकारी व्ही.डी. गावकर यांच्या नेतृत्वाखालील दलाच्या जवानांनी है मदतकार्य केले. ड्राईव्हर ऑपरेटर अमोल नाईक यांच्यासह आर. आर. मातोणकर, योगेश माईणकर आणि एस.ए. गावस या जवानांनी मदतकार्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.