
Lawyer Viral Video: दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोर्टातील युक्तिवाद किंवा न्यायाधीशांनी वकिलांना फटकारल्याबद्दलचा नसून ऑनलाइन सत्राच्या अगदी आधी एका वकिलाने केलेले अयोग्य वैयक्तिक वर्तन दर्शवणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (14 ऑक्टोबर) घडली असावी. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, न्यायाधीशांच्या येण्याची वाट पाहत असताना आणि कोर्टाचे कामकाज प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वी ही घटना घडली.
व्हिडिओ फुटेजमध्ये संबंधित वकील गणवेशात (Court Attire) आपल्या रुममध्ये बसलेला दिसत आहे. तो कॅमेऱ्यापासून थोडा दूर असल्याने त्याचा फक्त बाजूचा चेहरा दिसत आहे. त्याच्या समोर साडी नेसलेली एक महिला (Women) उभी असल्याचे दिसते. थोड्याच वेळात, तो वकील त्या महिलेचा हात ओढून तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. ती महिला थोडी संकोच करताना आणि विरोध करताना दिसते, परंतु वकील तिला आपल्याकडे खेचतो आणि तिच्या गालावर चुंबन (Peck) घेतो. त्यानंतर ती महिला मागे सरकते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत 79.7 हजारहून अधिक लोकांनी पाहिला. व्हिडिओमधील वकील आणि महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच, व्हायरल होत असलेल्या या फुटेजच्या सत्यतेची 'दैनिक गोमन्तक'ने पुष्टी केलेली नाही.
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाचे वकील शशांक शेखर झा यांनी हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत "दिल्ली उच्च न्यायालय" असे कॅप्शन दिले. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेले वकील कुमार दीपराज यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "हा न्यायाधीश (Judge) नाही. तो एक वकील (Advocate) असल्याचे दिसते. हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ज्योती सिंग यांचे कोर्ट आहे आणि तेव्हा कोर्टाचे कामकाज सुरु झालेले नव्हते."
एका अन्य युजरने तर उपहासात्मक टीका करत म्हटले की, "यानंतर त्याला नक्कीच बढती (Promoted) मिळाली असेल."
यापूर्वी, जून महिन्यातही अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. एका व्यक्तीने गुजरात उच्च न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीत भाग घेतला होता, पण त्यावेळी तो व्यक्ती चक्क टॉयलेट सीटवर बसलेला दिसला होता. या गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला गुजरात उच्च न्यायालयाने 1 लाखांचा दंड ठोठावला होता, तसेच त्याला 15 दिवसांची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली होती.
व्हर्च्युअल कोर्टाच्या सत्रादरम्यान झालेले हे दोन्ही प्रकार न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपण्याबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित वकिलावर बार कॉन्सिल आणि न्यायालयाने काय कारवाई करावी, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.