15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Spin Boldak Border: अफगाण तालिबानचे (Afghan Taliban) लडाके आणि पाकिस्तानी सैन्य (Pakistan Army) यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे.
Pakistan Afghanistan Clash
Pakistan Afghanistan ClashDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan Pakistan Clash: अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा तणाव वाढला झाला असून अफगाण तालिबानचे (Afghan Taliban) लडाके आणि पाकिस्तानी सैन्य (Pakistan Army) यांच्यात जोरदार झडप झाली. दोन्ही बाजूंकडून सीमावर्ती भागातील स्पिन बोल्डक येथे हल्ले करण्यात आले.

दरम्यान, बुधवारी (15 ऑक्टोबर) पहाटे साधारण 4 वाजता स्पिन बोल्डक भागात पाकिस्तानी सैन्य आणि अफगाण तालिबान यांच्यात जोरदार चकमक सुरु झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्पिन बोल्डक-चमन सीमा क्रॉसिंगवर ही चकमक सुरु असल्याचे दिसत आहे. स्पिन बोल्डक हे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ते उत्तरेकडील कंदाहार शहर आणि दक्षिणेकडील पाकिस्तानच्या चमन व क्वेटा शहराशी महामार्गाने जोडलेले आहे.

Pakistan Afghanistan Clash
Pakistan Coal Mine Clash: पाकिस्तानच्या कोळसा खाणीत तुफान राडा, 16 जणांचा मृत्यू

तालिबानचा मोठा दावा

अफगाण तालिबानने या लढाईत मोठी सरशी केल्याचा दावा केला. तालिबानच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या या चकमकीत त्यांनी केवळ 15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले आणि त्यांची शस्त्रे जप्त केली. एका व्हायरल व्हिडिओमध्ये तालिबान्यांनी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रे जप्त केल्याचे दाखवले आहे.

स्पिन बोल्डक जिल्ह्याचे माहिती प्रमुख अली मोहम्मद हकमल यांनी टोलो न्यूजला माहिती देताना सांगितले की, सुरु असलेल्या लढाईत हलकी आणि भारी दोन्ही प्रकारची शस्त्रे वापरली जात आहेत. सध्या या संघर्षात किती लोक जखमी झाले किंवा मारले गेले, याची कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. मात्र, पाकिस्तानी तोफखान्याच्या (Artillery) माऱ्यामुळे सामान्य नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली असून अनेक रहिवाशांना तो भाग सोडून पळून जावे लागले, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

Pakistan Afghanistan Clash
India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

ड्युरंड रेषेवर तणाव

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील कबीर हकमल यांनी सांगितले की, "स्पिन बोल्डक भागात तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये चकमक झाली. या चकमकीस अनेक सूत्रांनी दुजोरा दिला असून अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे." पाकिस्तानी सैन्य कथितरित्या ड्युरंड रेषेला (Durand Line) लागून असलेल्या भागांना लक्ष्य करण्यासाठी भारी शस्त्रे आणि हवाई शक्तीचा वापर करत आहे.

Pakistan Afghanistan Clash
Afghanistan Earthquake: 800 जणांचा मृत्यू; 2500 जखमी! अनेकजण ढिगाऱ्याखाली; भूकंपामुळे अफगाणिस्तानात गावे उध्वस्त

'एएफजीआय' (AFGEYE) नावाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डक गेटवर अफगाण सुरक्षा दल आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये आज पहाटे जोरदार चकमक झाली. यात पाकिस्तानी सुरक्षा दलाचे सैनिक मारले गेल्याची पुष्टी झाली. दुसऱ्या एका युजरने तर दावा केला की, अफगाण सैन्याने स्पिन बोल्डक येथील ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानच्या चौक्या नष्ट केल्या आणि डझनाहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना जीवंत पकडले. त्यांनी मोठ्या संख्येने हलकी आणि भारी शस्त्रे तसेच रणगाडे (Tanks) जप्त करुन ते अफगाणिस्तानमध्ये हलवले आहेत.

Pakistan Afghanistan Clash
Tawang Clash: तवांगमधील चकमकीवर चीनची पहिली रिअ‍ॅक्शन, सीमा वादावर म्हणाले...

अलीकडील संघर्ष आणि कारणे

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हा ताजा संघर्ष अशा वेळी झाला आहे, जेव्हा 11-12 ऑक्टोबरच्या रात्री अफगाण तालिबानने पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला होता. पाकिस्तान सातत्याने टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) ला अफगाणिस्तान आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, तर टीटीपी पाकिस्तानात वारंवार हल्ले करत आहे. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कंदाहार आणि हेलमंडमध्ये ड्रोन हल्ले केले होते. या तणावामुळे दोन्ही देशांनी सीमा बंद केल्या आहेत, ज्यामुळे व्यापार ठप्प झाला असून हजारो वाहने सीमेवर अडकून पडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com