Rain affected Woman In Satari Dainik Gomantak
गोवा

Minister Vishwajit Rane Helps Woman : परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं केलं, पण मंत्री राणेंनी सावरलं; स्वखर्चाने महिलेला देणार घर बांधून!

गोमन्तक डिजिटल टीम

Satari News: खोतोडे-सत्तरी येथील सोनिया परवार या गरीब महिलेच्‍या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले होते. याची दखल घेत स्थानिक आमदार तथा मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी या कुटुंबाला स्वखर्चाने नवीन घर बांधून देण्याचे आश्‍‍वासन दिले आणि कामाला सुरवातही केली.

परतीच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सत्तरीच्‍या अनेक भागात मोठी पडझड झाली. त्‍यात परवारवाडा-खोतोडे सत्तरी येथील सोनिया परवार यांच्या राहत्या घरावर झाड पडून छप्‍पर फुटले तसेच भिंतींना भेगा गेल्‍या. हे घर दुरुस्‍त करणे शक्य नाही. ज्‍यावेळी घटना घडली, त्यावेळी सोनिया या घरात एकट्याच होत्‍या. त्‍यांचा मुलगा प्रल्हाद घराबाहेर होता.

जेव्हा झाड घरावर कोसळले, त्यावेळी त्‍यांनी आपला जीव घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. अत्यंत गरीब परिस्थितीत त्‍या आपला उदरनिर्वाह करतात. झाड पडल्‍याने एका झटक्यात त्यांचे घर उद्ध्वस्त झाले. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर मोठे संकट कोसळले.

सदर घटनेची खबर आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना मिळताच त्यांनी स्थानिक पंच, सरपंच यांच्या सहकार्याने सोनिया व त्यांचा मुलगा प्रल्हाद यांची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्‍यांनी खोतोडा सरपंच रोहिदास गावकर, पंच राजाराम परवार यांना पाठवून घराची पाहणी करायला लावली. वाळपई अग्निशमन दलाने घरावर पडलेले झाड बाजूला काढले.

नवीन घराचे काम तातडीने सुरू

घरावर झाड पडल्‍यामुळे भरपावसात उघड्यावर राहण्याची वेळ परवार कुटुंबावर आली आहे. याची दखल आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी घेऊन ते घर दुरुस्‍त करता येत नसल्याने स्वतः नवीन घर बांधून देतो असे आश्‍‍वासन दिले व तातडीने त्‍याच घराच्‍या बाजूला नवीन घर बांधण्याच्या कामाला सुरवातही केली. त्‍यामुळे सोनिया परवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सोनिया परवार, खोतोडे-सत्तरी

मी नेहमीच आजारी असते. माझा मुलगा असाच कुठे तरी कामाला जातो. अत्‍यंत गरीब परिस्‍थितीत आम्‍ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत. त्‍यातच घरावर झाड कोसळल्‍याने आमच्‍यावर मोठे आभाळ कोसळले. मात्र मंत्री विश्‍‍वजीत राणे हे आमच्‍या मदतीला धावून आले. तसेच पंच राजाराम परवार, सरपंच रोहिदास गावकर यांनी खूप परिश्रम घेतले. या सर्वांचे खूप खूप आभार.

विश्‍‍वजीत राणे, आरोग्‍यमंत्री

सत्तरीतील जनतेला कोणताच त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सोनिया या गरीब महिलेला मदतीचा हात पुढे करणे हे माझे कर्तव्य होते आणि ते मी पूर्ण केले. मोडलेले घर दुरुस्त करणे शक्य नव्हे, त्यामुळे त्‍यांना मी स्वखर्चाने नवीन घर बांधून देणार आहे. घराच्‍या कामाला सुरवातही झालेली आहे. आतापर्यंत सत्तरीतील अनेक गरिबांना घरे बांधून दिलेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT