Vishwajit Rane residence protest Dainik Gomantak
गोवा

Goa News: मंत्र्यांच्या बंगल्यावरील मोर्चा भोवला; विरोधी पक्षनेते, आमदारांसह दीड हजारांहून अधिक आंदोलकांवर गुन्हा

Vishwajit Rane residence protest: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्री राणे यांच्या निवासस्थानाजवळ पूर्वपरवानगीशिवाय, बेकायदेशीररित्या जमाव जमवून आंदोलन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दोनापावला येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी पणजी पोलिसांनी रस्ता अडवून लोकांची गैरसोय केल्याच्या आरोपाखाली विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, आमदार कार्लुस फरेरा यांच्यासह सुमारे दीड हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या आंदोलनामुळे दोनापावला येथील मुख्य रस्ता सुमारे आठ तास बंद राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दोनापावला येथे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानाजवळ पूर्वपरवानगीशिवाय, बेकायदेशीररित्या जमाव जमवून आंदोलन केले.

आमदार वीरेश बोरकर यांच्या समर्थनार्थ आणि नगरनियोजन कायद्याच्या कलम ३९-ए रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले होते. मात्र, नंतर आंदोलकांनी सार्वजनिक रस्ते अडविल्यामुळे परिस्थिती चिघळली, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीनुसार दोनापावला येथील मुख्य रस्ता संध्याकाळी ४ ते रात्री १०.३० पर्यंत आठ तासांहून अधिक काळ अडविला होता. त्यामुळे प्रवासी आणि सामान्य जनतेची मोठी गैरसोय झाली.

आंदोलकांनी सार्वजनिक रस्ते वापरण्यापासून लोकांना रोखले आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दीपेश शेटकर करत आहेत. काही आंदोलकांची ओळख पटली असली तरी, ‘एफआयआर’मध्ये त्यांचे पत्ते बहुतांश ‘अज्ञात जिल्हा’ असे नोंदविले आहेत.

गुन्हे नोंदविलेले आमदार-नेते

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आमदार वेन्झी व्हिएगस आमदार क्रूझ सिल्वा आमदार कार्लुस फरेरा आपचे वाल्मिकी नाईक आरजी पक्षाध्यक्ष मनोज परब अजय खोलकर गोविंद शिरोडकर रेघना कुंकळकर स्मिता शिरोडकर संदेश तळेकर तुषार गावस वासू कुंकळकर लुसिओ रोंकोन अँटोनी डिसिल्वा रोहन कळंगुटकर सिसिल रॉड्रिग्स सुनील नाईक स्वप्नेश शेर्लेकर आर्थूर डिसोझा चेतन कामत चिराग नाईक सुदीप दळवी फिडॉल परेरा सुनील सांतिनेजकर महेश म्हांबरे संजय नाईक भुवनेश्वर फातर्पेकर तृप्ती बकाल रामा काणकोणकर तुळशीदास प्रभू गजानन तिळवे योगेश गोवेकर सावियो (दक्षिण गोवा टॅक्सी असोसिएशन) भूपेश देसाई फ्रान्सिस कुएल्हो

* इतर १५०० आंदोलक

तब्बल आठ तास रस्ता बंद : आंदोलनादरम्यान रस्ता अडविल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी दीड हजारांहून अधिक आंदोलक आणि टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा रस्ता तब्बल आठ तास बंद करण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. तिसवाडीचे सहमामलेदार-३ आणि कार्यकारी दंडाधिकारी रामकृष्ण साळगावकर यांनी ही तक्रार पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे.

...या कलमांखाली गुन्हे दाखल?   

कलम १८९- बेकायदेशीर जमाव   कलम १८९(२)- बेकायदेशीर जमावाचा सदस्य असणे   कलम १९१(२)- दंगल, घातक शस्त्रांनी सज्ज   कलम १३२- कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा फौजदारी बळ वापरणे   कलम १२६(२)- रस्ता अडविणे   कलम १९०-बेकायदेशीर जमावाच्या सदस्यांनी केलेले गुन्हे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 122 षटकार, 127 चौकार! भारतीय वंशाच्या खेळाडूची 'विराट' खेळी, गोलंदाजांसाठी ठरला काळ; टी20 मध्ये केला अचाट रेकॉर्ड

Odisha Food Poisoning: दहीवडा खाणं पडलं महागात, 27 बालकांसह 58 जणांना विषबाधा; ओडिशात खळबळ

IPL 2026 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचं भवितव्य दुसऱ्यांच्या हातात, चेन्नईविरुद्धच्या पराभवानं बदललं समीकरण; प्लेऑफच्या आशा धूसर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार! 4 राशींसाठी धनलाभाचा सुवर्णयोग, सूर्याचं नक्षत्र गोचर भाग्याचं; आयुष्यात येणार सुखाचे दिवस

जामिनावर सुटताच गौतम खट्टर पत्रकारांवरच घसरला! "गोव्यातील पत्रकारांनी नैतिकता शिकावी" म्हणत उधळली मुक्ताफळे; वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा सापडला वादात

SCROLL FOR NEXT