Dudhsagar river Dainik Gomantak
गोवा

'Dudhsagar'चे पाणी गढुळ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण?

दैनिक गोमन्तक

दूधसागर नदीचे पाणी सुमारे एक महिन्यापासुन गढूळ येत असल्याने या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणाऱ्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून आज मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दूध सागर नदीचे पाणी गढूळ का? याबाबतचा अहवाल तातडीने सादर करा असे आदेश जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

(minister Subhash shirodkar formed committee to find reason behind impure Dudhsagar river water )

याबाबत बोलताना दुधसागर नदी पात्र परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी म्हटले आहे की, नदीचे पाणी सुमारे एक महिन्यापासून गढूळ येत आहे. याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने पाहिलेले नाही. अथवा कोणतेही मंत्री या प्रश्नासाठी इकडे फिरकलेले नाहीत. हे पाणी आम्ही पिण्यासाठी वापरत असून आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

या पार्श्वभूमीवर आज मंत्री सुभाष शिरोडकर यांनी बैठक बोलवत याबाबतची अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, यावेळी शिरोडकर यांनी मामलेदार, सरपंच, यांचा समावेश असणारी एक समिती स्थापन केली असून या समितीला तातडीने याचा शोध घेत कारणे स्पष्ट करणारा अहवाल सादर करावा अशा आज सूचना देण्यात आल्या आहेत.

ना मंत्री महोदयांचे लक्ष आहे, ना अधिकाऱ्यांचे

या घटनेवर दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी नदीच्या पात्रात पाणी गढूळ असून याकडे गेले कित्येक दिवस ना मंत्री महोदयांचे लक्ष आहे, ना अधिकाऱ्यांचे, असे मत मांडत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या समितीने अहवाल सादर केल्यानंतर तरी हा प्रश्न सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT