CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Appeal: नितळ गोव्यात रस्त्यावर कचरा टाकू नका; मुख्यमंत्री सावंतांची पर्यटकांना भावनिक साद

केरी-चोर्ला घाटात मोठ्या प्रमावर प्लास्टिकचा तसेच, इतर प्रकारचा कचरा टाकण्यात आला आहे.
Published on

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी तसेच, गोव्यातील नागरिकांनी घाटरस्ता व कोणत्याही रस्त्यावर प्लास्टिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केले. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

'कर्नाटक सिमेवरून येताना केरी-चोर्ला घाटाचे सौंदर्य तसेच, हणजूण धरण पाहून परत येताना रस्त्यावर मोठ्या प्रमावर प्लास्टिकचा तसेच, इतर प्रकारचा कचरा टाकण्यात आला आहे. अशा प्रकारे कचरा टाकल्याने पर्यावरण दुषित होते. तसेच, मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्यास तो उचलण्यास देखील मोठे कष्ट उचलावे लागतील. त्यामुळे मी समस्त गोमंतकीय आणि गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करतोय की रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे.' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant
Beer To Get Costlier: स्वस्त आता विसरा, गोव्यात बिअर महागणार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'सह्याद्री घाटाचे रक्षण आपण सर्वांनीच करायला हवे. वैविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या घाटात अनेक निसर्गरम्य सौंदर्य आणि प्राण्याचा अधिवास आहे, तो आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळे या निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला हवी.' असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com