Subhash Phaldesai Goa Goa
गोवा

Goa Crime: मंत्री सुभाष फळदेसाईंकडे कोट्यवधी रुपयांची मागणी, सतत फोन कॉल्स; मिथिल देसाईविरुद्ध तक्रार दाखल

Subhash Phaldesai Complaint: केपे पोलिसांनी मिथिलला (ता. २४) बेकायदा चिरेखाण चालविल्याप्रकरणी अटक केली होती.

Sameer Panditrao

Subhash Phaldesai Crime News

केपे: रिवण येथील मिथिल उल्हास देसाई याने फोन करून अभद्र भाषेत माझ्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रायबंदर येथील सायबर गुन्हा पोलिस स्थानकात नोंदविली आहे.

मिथिल हा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सतत मानसिक त्रास देत असून गेल्या चार दिवसांत शंभरपेक्षा जास्त वेळा फोन करून त्याने त्रास दिला असल्याचे फळदेसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे. मिथिलने आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांवर प्रसारित केले आहेत. माझी सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी अनावश्यक पोस्ट समाज माध्यमांवर अपलोड केल्याने मिथिलवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी फळदेसाई यांनी केली आहे.

बेकायदा चिरेखाणप्रकरणी मिथिलवर कारवाई

केपे पोलिसांनी मिथिलला काल (ता. २४) बेकायदा चिरेखाण चालविल्याप्रकरणी अटक केली होती. मिथिलने काही महिन्यांपूर्वी फळदेसाईंना असेच फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा मिथिलने त्रास देणे सुरू केले आहे, असे सुभाष फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT