Cm sawant appreciate minister Subhash Phaldesai on His Birthday Dainik Gomantak
गोवा

2017 ते 22 मध्ये फळदेसाई नसल्यामुळेच सांगे 5 वर्षे मागे राहिले; वाढदिनी मुख्यमंत्र्यांचा फळदेसाईंवर कौतुकाचा वर्षाव

फळदेसाई नसल्यामुळे सांगे 5 वर्षे मागेच! : मुख्यमंत्री

Kavya Powar

Subhash Phaldesai Birthday: सांगेचे आमदार आणि समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या वाढदिनानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फळदेसाईंना शुभेच्छा आणि त्यांच्या आजवरच्या करकीर्दीचे कौतुक केले. कावरे पिर्ला ग्रामपंचायतीच्या नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटनावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामपंचायतीमध्ये पंच सदस्य ते सरपंच, मग पुढे आमदार ते मंत्री असा फळदेसाईंचा राजकीय प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. ते ज्या ग्रामपंचायतीमध्ये पंच सदस्य म्हणून कार्यरत होते, त्याच पंचायतीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, ही खरंच बहुमानाची बाब आहे.

आज अशी परिस्थिती आहे की कुणी 100 मीटर जमीनही दान करू इच्छित नाही, मात्र गावाच्या प्रगतीसाठी फळदेसाई कुटुंबाने 1300 स्के. मी जमीन दान केली, ही कौतुकाची गोष्ट आहे.

फळदेसाई नसल्यामुळे सांगे 5 वर्षे मागेच! : मुख्यमंत्री

फळदेसाईंचे कौतुक करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 2017 ते 22 मध्ये सांगेतील मतदारांनी सुभाष फळदेसाईंना निवडून न दिल्याने मतदारसंघ 5 वर्षे मागे राहिला आहे. जी विकासाची कामे फळदेसाई आता करत आहेत, ती खरेतर 2018 मध्येच झाली असती जर त्यांना नागरिकांनी निवडून आणले असते.

स्वत:च्या स्वार्थापलीकडे जाणून फळदेसाई लोकहिताची कामे सातत्याने करत आहेत. यामुळे गावाच्या, मतदारसंघाच्या आणि गोव्याच्या एकंदरीत विकासात मोलाची भर पडत आहे. तरुणांना नोकरी मिळावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील आहेत.

फळदेसाईंनी ज्या पंचायतीमध्ये काम केले त्या पंचायतीचा कायापालट होत असल्यामुळे गावाची उन्नती होण्यास हातभार लागणार आहे. कारण जर आपल्याला स्वयंपूर्ण गोवा हे ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना यशस्वी झाली पाहिजे, त्यासाठी ग्रामपंचायत ही गोष्ट केंद्रस्थानी आहे.

कावरे पिर्ला पंचायतीच्या नवीन इमारतीमुळे गावातील तरुण मंडळी आणि महिलांना विविध गोष्टींमध्ये फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! एकाचा मृत्यू

Bicholim Car Accident: नियंत्रण सुटलं अन् कार नदीत कोसळली... चालकाची जीव वाचवण्यासाठी धडपड, सुदैवाने बचावला; डिचोलीतील घटना

SCROLL FOR NEXT