Bicholim School: निलंबनाच्या कारवाईनंतर पालक शांत, विद्यालयातील स्थिती पूर्वपदावर

‘पेपर स्प्रे’ प्रकरण ः श्री शांतादुर्गा विद्यालयातील स्थिती पूर्वपदावर
Bicholim School
Bicholim School Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim School: ''पेपर स्प्रे'' प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर निलंबनाच्या कारवाईनंतर श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील वातावरण आता काहीसे थंड झाले आहे. विद्यालयातील परिस्थितीही पूर्वपदावर येत असून, वर्गही नियमित सुरू आहेत.

दुसऱ्या बाजूने संशयित विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली, तरी या एकंदरीत या प्रकरणाची शिस्तपालन समितीतर्फे चौकशी चालूच राहणार आहे.

भविष्यात असे प्रकार घडता कामा नयेत. त्यासाठी व्यवस्थापन मंडळासह शिक्षकही सतर्क झाले आहेत. या घटनेनंतर शाळेत अतिरिक्त सीसी टीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

Bicholim School
Goa NSUI: ते दहा लाख रूपये ABVP कडून वसूल करा अन्यथा... NSUI ने दिला मुख्यमंत्र्यांना इशारा
Bicholim School
Bicholim School Dainik Gomantak

बाधित विद्यार्थिनीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, विद्यार्थिनींना हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शांतादुर्गा विद्यालयातील कथित ''पेपर स्प्रे'' प्रकरण घडल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. शिक्षण खात्यानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत शाळेला ''कारणे दाखवा'' नोटीस बजावली आहे.

Bicholim School
Sadanand Shet Tanawade: कार्यकर्ते हेच पक्षाचे बळ; लोकसभेच्या जागा याच बळावर जिंकणार

याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करा, असे निर्देश शिक्षण खात्याने शाळा व्यवस्थापन समितीला दिले होते. या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) शाळेच्या पालक-शिक्षक संघाची एक महत्त्वाची बैठक झाली.

निलंबन त्वरित मागे घ्या

पेपर स्प्रे प्रकरणातील विद्यार्थ्यांचे एक महिन्याचे निलंबन अपमानास्पद असल्याने ते त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी गोवा बालहक्क आयोगाने शिक्षण मंडळाला केली आहे तसेच एका आठवड्यात या प्रकरणाचा शिस्तपालन समितीच्या शिफारसींचा अहवाल मागितला आहे. आयोगाचा दावा आहे की एक महिन्याचे निलंबन अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी अपमानास्पद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com