रोहन खंवटे Dainik Gomantak
गोवा

Goa Election: मंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरी मतदारसंघातील काही पंचायतींमध्ये उतरविले आपले पॅनल

बार्देश तालुक्यात अनुभवी राजकारण्‍यांनी आपली पॅनल्‍स उभी केली आहेत. तर, नवख्या आमदारांनी थोडीशी सावध भूमिका घेतल्याचे दिसते.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: पंचायत निवडणुकीनिमित्त बार्देश तालुक्यात अनुभवी राजकारण्‍यांनी आपली पॅनल्‍स उभी केली आहेत. तर, नवख्या आमदारांनी थोडीशी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. आज बुधवारी बार्देशातील 33 पंचायतींसाठी मतदान होणार आहे.

(Minister Rohan Khanwate has deployed his panel in some Panchayats of Porvorim Constituency)

बार्देशात एकूण 279 प्रभाग आहेत. मात्र, यापूर्वीच 13 प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात 266 प्रभागांसाठीच मतदान होईल. तालुक्यातील 1 लाख 63 हजार 816 मतदार 266 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत सीलबंद करतील.

बार्देशात अनुभवी राजकारण्‍यांपैकी एक असलेले मंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरी मतदारसंघातील काही पंचायतींमध्ये आपले पॅनल उतरविले आहे. तर, आमदार मायकल लोबोंनी कळंगुटमध्ये स्वतःचे पॅनल उभे केले आहे. या अनुभवी नेत्यांनी यावेळी उघडपणे प्रचारात सहभाग घेतलेला दिसला. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, हळदोण्‍याचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा या नवख्या लोकप्रतिनिधींनी मात्र थोडीशी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

दरम्‍यान, साळगावचे आमदार केदार नाईक यांनीही आपल्‍या मतदारसंघातील काही पंचायतींमध्ये आपले पॅनेल उभे केले असून, रेईश-मागूसमधून या आधीच आपले पाच उमेदवार त्यांनी बिनविरोध निवडून आणले आहेत. दुसरीकडे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मात्र थिवी मतदारसंघातील पंचायतींमध्ये स्वतःचे पॅनेल उतरविले नसले तरी पडद्यामागून त्यांच्या हालचाली सुरू आहेत.

सोशल मीडियाचा खुबीने वापर

मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उद्या पावसाचा जोर राहिल्यास मतदानाच्या टक्केवारी प्रभाव पडू शकतो. त्यामुळे काही प्रभागांतील लढती अधिक चुरशीच्या व तितक्याच रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांदोळीतील प्रभाग 3 व पेन्ह द फ्रान्समधील प्रभाग 5 व 6 ही असंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. बार्देशात 73 प्रभागांत थेट लढती होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT