मतदारसंघांतील मंत्र्यांची तटस्थ भूमिका! पाच मंत्र्यांच्या बालेकिल्ल्याकडे लक्ष

फोंड्यात उत्कंठा : 19 पंचायतींतील 160 उमेदवारांचे भवितव्य पणाला
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: राज्‍यातील 186 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. फोंडा तालुक्यातील 19 पंचायतींसाठी 160 उमेदवार रिंगणात आहेत. फोंडा, प्रियोळ, मडकई व शिरोडा या चार मतदारसंघांत 18 पंचायती तर उसगाव-गांजे ही पंचायत वाळपई मतदारसंघात येते. या पाचही मतदारसंघांचे आमदार मंत्री असल्‍यामुळे या पंचायतींच्या निवडणुकींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

(Elections of these panchayats have gained importance as MLAs of all five constituencies are ministers)

Goa Panchayat Election
आमदार तुयेकर यांची नावेलीत कसोटी!

फोंडा, प्रियोळ, शिरोडा व मडकई या चारही मतदारसंघांचे मंत्री तटस्थ राहिल्याचे या निवडणुकीत बघायला मिळाले. पण वरवर जरी ते तटस्थ वाटत असले तरी पडद्यामागे बरेच राजकारण शिजले आहे. मतदारांना योग्य संदेश पोहचण्याचे काम ते किंवा त्यांचे कार्यकर्ते करताना दिसतात. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी प्रचारात जरी भाग घेतला नसला तरी त्यांचे समर्थक काही उमेदवारांसाठी वावरताहेत. दुसरीकडे वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी मात्र आपल्या समर्थकांचा थेट प्रचार केल्याचे दिसले. त्यांचेही काही समर्थक एकामेकांविरोधात उभे ठाकल्याचे दिसत असले तरी आरोग्यमंत्र्यांनी त्यातून सुवर्णमध्य काढला आहे. जो येईल तो आपला हा फॉर्म्युला त्यांनी वापरला आहे.

उसगाव-गांजे पंचायतीत आरोग्यमंत्री राणे यांचेच वर्चस्‍व असल्यामुळे त्यांचेच बहुतेक समर्थक निवडून येणार हे निश्‍चित आहे. त्यांना लढत देत आहे तो रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष. मागच्या वेळी वाळपईतून सहा हजारांहून अधिक मते प्राप्त केल्यामुळे त्यांचा हुरुप वाढल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.

Goa Panchayat Election
Goa Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

उर्वरित मतदारसंघांत थोडाफार तसाच प्रकार असून फोंडा मतदारसंघातील कुर्टी-खांडेपार या एकमेव पंचायतीत मात्र तीव्र चुरस असल्याचे दिसते. मगो पक्ष थंड असल्यासारखा वाटत असला तरी कुर्टी-खांडेपार पंचायतीत या पक्षाचे अनेक समर्थक भाजप समर्थकांना आव्हान देत आहेत. काँग्रेस पक्षही इथे रिंगणात उतरला असून काही जागांवर त्यांचे समर्थक विजय मिळवू शकतात.

सुदिन ढवळीकरांचा मडकईत वरचष्‍मा

मडकईत सुदिन ढवळीकर यांची हवा असून तिथे त्‍यांचे समर्थकच बाजी मारणार हे जवळजवळ निश्‍चित आहे. त्यांचेही काही समर्थक एकमेकांविरोधात रिंगणात उतरले आहेत. तेथे सुदिन यांनी तटस्थ भूमिका घेतलेली दिसते.

प्रियोळात भाजपला आव्‍हान ‘आरजी’चे

प्रियोळात मंत्री गोविंद गावडे हे सक्रीय झाले नसले तरी त्यांच्या मतदारसंघातील सात पंचायतींतून त्यांचेच समर्थक निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकाच प्रभागात अनेकजण आपणच गोविंद गावडे यांचे उमेदवार असे सांगत असल्यामुळे थोडाफार पेचही निर्माण झाला आहे. प्रियोळमध्‍ये ‘आरजी’ भाजपला तोंड देऊ शकेल अशी चिन्हे दिसताहेत. तसे पाहायला गेल्यास फोंडा सोडल्यास इतर तीन मतदारसंघातील पंचायतीत आरजीचा बऱ्यापैकी जोर दिसून आला. आता कोण सिंकदर ठरतो याचे उत्तर आज मतदार मतदानाद्वारे देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com