Min Mauvin Godinho In Pernem Janta Darbar  Dainik Gomantak
गोवा

Pernem Janta Darbar : मोपा विमानतळ पेडण्याच्या विकासाचे द्वार : वाहतूकमंत्री गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

North Goa District Pernem Janta Darbar : मोपा विमानतळ हे पेडणे तालुक्यासाठी विकासाचे द्वार व पेडण्याचे भाग्य आहे. मोपा विमानतळामुळे तालुक्यात रोजगार उपलब्ध झालेला आहे. यापूर्वी पेडणेत काहीही विकास होत नाही, असा सुरू होता.

मोपा विमानतळामुळे आता विकासाची दारे खुली झालेली आहेत. लोकांना चांगली सेवा मिळावी व चुका सुधारता याव्यात यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन पंचायत व वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी धारगळ येथे केले.

धारगळ ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (ता.१४) उत्तर गोवा जनता दरबार कार्यक्रमाचे गुदिन्हो यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, साळगावचे आमदार केदार नाईक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे, औद्योगिक संचालक जीआयडीसीचे व्यवस्थापक अभिषेक, जिल्हाधिकारी खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

समस्या सोडविण्याचे मंत्र्यांचे आश्वासन

जनता दरबारात मांडलेल्या सूचनांवर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी उत्तरे दिली. काही तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

तसेच लवकरात लवकर अशा समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनीही समस्‍या मांडल्‍या.

‘गोंयचो पात्रांव’ योजनेद्वारे अनेकांना टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही योजना सुरू केली. त्याचा पेडणे तालुक्यातील अनेकांना लाभ झाला आहे. पेडणे तालुक्याशी माझे निकटचे संबध आहेत. संपूर्ण पेडणे तालुक्याची मला माहिती आहे.

- माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT