Independence Day 2023: राज्यभर स्वातंत्र्यदिनाचा माहोल; घरांवर तिरंगा, शासकीय इमारतींवर रोषणाई

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर विविध उपक्रम
CM Pramod Sawant On Independence Day 2023 In Goa
CM Pramod Sawant On Independence Day 2023 In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Celebrating Independence Day 2023 In Goa: आज देशाचा 77वा स्वातंत्र्यदिन. यानिमित्ताने राज्यभर स्वातंत्र्य दिनाचा माहोल असून केंद्र सरकारने आवाहनाप्रमाणे 'हर घर तिरंगा' या उपक्रमानुसार घरांवर तिरंगा फडकवण्यात आला.

ऐतिहासिक वास्तू, शासकीय इमारती, धरणांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील डीपी, स्टेटसवर तिरंगा झळकताना दिसत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पणजीत पार पडला.

धरणांचे पाणी हो ’रंगीबेरंगी’

राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली आणि अंजुणे या जलस्त्रोत खात्याच्या मोठ्या पाणी प्रकल्पांवर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली असून ती नागरिकांना रात्री ९ वाजेपर्यंत पाहता येणार आहे.

CM Pramod Sawant On Independence Day 2023 In Goa
Goa Janta Darbar : कुडचडे येथे सरकारी बाबूंच्‍या गलथान कारभाराचा ‘पंचनामा’

वाहतुकीची कोंडी

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या आल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक आले आहेत. यामुळे राज्यभरातील हॉटेल फुल्ल झाले असून पर्यटकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी उद्‌भवली. यातच पणजीत काही रस्ते एकेरी केल्याने या कोंडीत भर पडल्याचे सोमवार दिसले.

ऐतिहासिक वास्तूही झळाळल्या

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जुने सचिवालय, आझाद मैदान, आगवाद जेल म्युझियम, लोहिया मैदान मडगाव, पत्रादेवी स्मारक आदी ऐतिहासिक वास्तू तर विधानसभा, सचिवालय, मंत्रालय, राजभवन, जिल्हाधिकारी कार्यालये उपजिल्हाधिकारी कार्यालये या शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आले असून अनेक इमारतींना तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com