Goa Tourism minister Rohan Khaunte, pwd Minister nilesh cabral in Janta Darbar
Goa Tourism minister Rohan Khaunte, pwd Minister nilesh cabral in Janta DarbarDainik Gomantak

Goa Janta Darbar : कुडचडे येथे सरकारी बाबूंच्‍या गलथान कारभाराचा ‘पंचनामा’

लोकांना कामासाठी झिजवाव्‍या लागतात पायऱ्या
Published on

Janata darbar In Goa: जनतेच्‍या समस्या ऐकून घेण्यासाठी कुडचडे रवींद्र भवनात आज आयोजित करण्यात आलेला जनता दरबार बराच गाजला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा लोकांनी पाढाच वाचला.

कामासाठी सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या वारंवार झिजवाव्या लागतात असे लोकांनी सांगितले. तर, केपेचे नगरसेवक अमोल काणेकर यांनी कोमुनिदादचे ॲटर्नीच कोमुनिदादच्‍या जमिनी विकत असल्याचा गंभीर आरोप केला.

दरम्‍यान, यावेळी उपस्‍थित असलेले पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यापुढे लोकांना त्रास सहन करावे लागणार नसल्याचे सांगून त्‍यांना आश्‍‍वस्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केला.

पाच महिने उलटूनही रूपांतरण दाखला दिला जात नाही. तारीख दिली जाते, पण त्या दिवशी गटविकास अधिकारी गायब असतात. ठराव घेऊन दोन वर्षें उलटली तरी धोकादायक वीजखांब बदलले नाहीत, अशा तक्रारी लोकांनी केल्‍या.

ज्या समितीवर जमीन विक्रीचा आरोप आहे, त्याच समितीकडे कोमुनिदादने अहवाल मागितल्याचे उघड झाल्यामुळे खंवटे संतापले. ताबडतोब चौकशी करून अहवाल सादर करा, असा आदेश त्‍यांनी दिला.

 Goa Tourism minister Rohan Khaunte, pwd Minister nilesh cabral in Janta Darbar
MLA Premendra Shet : सती देवीच्या मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणार; आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली पाहणी

महागाई भत्त्याची थकबाकी रखडल्याच्या आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी कर्मचारी रमाकांत गावकर यांनी केला. अधिकारी आमचे फोनसुद्धा घेत नाहीत असे ते म्हणाले.

त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या खंवटे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्‍हणाले, सरकारने ज्‍येष्ठ नागरिकांसाठी ‘ग्रामीण मित्र’ योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून त्‍यांना सर्व सुविधा पुरविण्‍याचा प्रयत्न केला जाईल.

काणकोण तालुक्‍यात वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. लहानमोठ्या आजारांसाठी रुग्‍णाला मडगावला पाठवले जाते. सरकारी आरोग्यकेंद्राचे डॉक्टर दुपारी निघून जातात. त्यांना निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.

तसेच पर्यटनस्थळांचा विकास करावा, अशी मागणी यावेळी लोकांनी केली. तर, अनिल बांदोडकर यांनी वार्का येथे जमीनदाराकडून पारंपरिक रस्ता बंद केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.

सासष्टी मामलेदारांकडे याबाबत आठ सुनावण्या झाल्या, पण अजून कोणताही निर्णय झालेला नाही असेही ते म्हणाले.

दरम्‍यान, या जनता दरबारला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, नगराध्यक्ष प्रदीप नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.

 Goa Tourism minister Rohan Khaunte, pwd Minister nilesh cabral in Janta Darbar
शिवरायांच्‍या पुतळ्याची विटंबना; पोलिसांनी घेतले तिघांना ताब्‍यात, जमावाकडून दुकानांची मोडतोड

‘त्‍या’ गटविकास अधिकाऱ्याला नोटीस

गटविकास अधिकारी कधीच जाग्यावर नसतात अशी तक्रार सदानंद राऊत यांनी केली. तारखा देऊन अधिकारी गायब होतात. लोकांना वकिलाचा खर्चही करावा लागतो, असेही त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, त्या गटविकास अधिकाऱ्याबाबत मंत्री रोहन खंवटे यांनी चौकशी केली असता जनता दरबार आयोजनाची माहिती असूनही तो गायब असल्याने त्यांच्या निदर्शनास आले.

त्‍यामुळे मंत्री आणखी संतप्‍त बनले व त्‍यांनी गायब असलेल्या त्‍या गटविकास अधिकाऱ्याला नोटीस काढण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.

उत्तर गोव्‍यातील जनता दरबारही गाजला

उत्तर गोव्‍यात धारगळ येथे आज झालेल्‍या जनता दरबाराला पंचायत व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी उपस्‍थिती लावली. येथेही जनतेने आपल्‍याला सतावणाऱ्या विविध समस्‍या मंत्र्यांसमोर मांडल्‍या.

जनता दरबारात फक्त तीन मिनिटेच बोलण्यास वेळ दिला जातो, सरकारी अधिकारी माईक काढून घेतात किंवा काही वेळा पोलिसी बळाचा वापर करून बोलण्यास देत नाहीत, अशा तक्रारी अनेकांनी केल्या.

तसेच पेडणे तालुक्यापुरताच जनता दरबार घ्यावा, अशी सूचनाही करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com