Lumpy Skin Disease| Ministar Nilkanth Halarnkar  Dainik Gomantak
गोवा

Lumpy Skin Disease: गोव्यात 'इतक्या' गायींनी लम्पी रोगाची लागण; पशुपालन मंत्र्यांची माहिती

लम्पीची लागण झालेल्या गायींसाठी सिकेरी येथे स्वतंत्र विभाग

Akshay Nirmale

Lumpy Skin Disease: देशभरातील गायींना लम्पी रोगाची लागण झाल्याची प्रकरणे गेल्या काही काळात समोर आलेली आहेत. त्यातच आता गोव्यातही लम्पीचा प्रसार व्हायला सुरवात झाली आहे.

गोव्यातील किती गायींना या रोगाची लागण झाली आहे, याची माहिती नुकतीच राज्याचे पशुपालन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

मंत्री हळर्णकर म्हणाले की, गोव्यातील ३२ गायींना लम्पी रोगाची लागण झाली आहे. लम्पीची लागण झालेल्या गायींवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी अशा गायींना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. सिकेरीतील गोशाळेजवळ त्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला गेला आहे.

गोमंतक गोसेवक महासंघ या सिकेरी - डिचोली येथील गोशाळेने लम्पी रोगाने पिडीत गुरांसाठी विशेष विलगीकरण कक्ष तयार केला आहे. या गुरांवर उपचार देखील येथे केले जात आहेत.

ही गोशाळा कमलाकांत तारी चालवत असून त्यांच्या गोशाळेत सुमारे दोन हजार गुरे आहेत. त्याशिवाय त्यांनी आणखी एक गोशाळा सुरू केली आहे. येथे लंपी पिडीत गुरांवर उपचार केला जातो. सरकारकडून गोशाळेला शक्य तेवढी मदत केली जात आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी मंत्री हळर्णकर यांनी म्हटले होते की, लम्पीची प्रकरणे राज्यात आढळली असून पशुसंवर्धन खात्याकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. लम्पी रोगाने पीडित गुरे आढळल्यास त्यांची सूचना खात्याला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन सेवा देण्यासाठी पशुसंवर्धन खात्याने डॉक्टर्स नेमले आहेत. परंतु शेतकऱ्यांनी त्यांची जनावरे आजारी असल्याबाबतचे फोन कॉल करूनही ते टाळले जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने गुरांना गोवा डेअरीमध्ये घेऊन जाण्याची पाळी आली आहे.

त्यामुळे या पुढे फोन कॉल चुकवल्यास सुरुवातीला दोन वेळा ताकीद दिली जाईल आणि तिसऱ्यांदा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT