Yuri Alemao: कॉंग्रेस आमदाराने 'या' कारणासाठी मानले भाजप मंत्र्याचे आभार

चांदर -गिरदोली-माकाझान येथील लोकांची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध
Yuri Alemao |Goa News
Yuri Alemao |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao: चांदर गावातून जाणारा राज्य महामार्ग 8 हा प्रमुख जिल्हा रस्ता 54 म्हणून बदलण्यासाठी गोवा सरकारने अधिसूचना जारी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचे आभार मानले आहेत.

चांदर -गिरदोली-माकाझान येथील लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आलेमाव यांनी दिली.

Yuri Alemao |Goa News
Palolem Beach : गोव्यात प्रेमी प्रेमीयुगुलाचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच घडलेल्या घटनेने खळबळ

"गोवा विधानसभेत शून्य प्रहरात सदर मुद्दयावर सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेवून सदर अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे वारसा स्थळ असलेल्या चांदरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल."

"भरधाव जाणाऱ्या अवजड वाहनांमूळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता. गावातील वारसा घरांच्या नुकसानीच्या आव्हानांनाही लोकांना तोंड द्यावे लागत होते," असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Yuri Alemao |Goa News
Asian Games 2023 : सेलर कात्या कुएल्हो आशियाई स्पर्धेसाठी पात्र; पर्ल कोलवाळकर, डेन कुएल्हो यांना रौप्यपदक

"अवजड वाहनांची हालचाल; विशेषत: चांदर गावातून जाणारे ट्रकही थांबवण्याची गरज आहे. वाहनांची गती नियंत्रीत करण्यासाठी चांदरच्या लोकांनी रस्त्याच्या कडेला फलक लावले होते मात्र, काही समाजकंटकांनी ते काढून टाकले."

"सार्वजनीक बांधकाम खात्याने रस्त्यावर आवश्यक फलकही उभारावेत तसेच मी पोलीस अधिकार्‍यांकडे अवजड वाहतुकीच्या हालचालींवर निर्बंध घालण्याची मागणी करतो" असे आलेमाव यांनी सांगितले.

"कुंकळ्ळी मतदारसंघात विविध रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू झाले आहे. मी माझ्या मतदारसंघातील काही वॉर्डांमध्ये वीज वितरणासाठी ट्रान्सफॉर्मरही सुरू केले आहेत. टप्प्याटप्प्याने कुंकळ्ळीचा विकास लोकांना दिसेल," अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com